For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वारणेत शुक्रवारी रंगणार कुस्तीचा महासंग्राम

06:38 AM Dec 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
वारणेत शुक्रवारी रंगणार कुस्तीचा महासंग्राम
Advertisement

देशातील नामवंत मल्लांचा सहभाग, इजिप्तमधील मल्ल ठरणार प्रमुख आकर्षण

Advertisement

वारणानगर/ प्रतिनिधी

येथील श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे संस्थापक सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या 30 व्या पुण्यस्मरणानिमित्त वारणानगर ता. पन्हाळा येथेशुक्रवार दि. 13 रोजी भारत व इजिप्त यांच्यातील नामवंत मल्लांमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंग्राम पार पडणार असल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली.

Advertisement

वारणा विद्यालयाच्या भव्य पटांगणावर असलेल्या मैदानावर दुपारी एक वाजता आंतरराष्ट्रीय विश्वनाथ वारणा शक्ती कुस्ती चा महासंग्राम सुरू होणार आहे. यामध्ये प्रमुख अकरा शक्ती श्री किताबासह 35 पुरस्कृत कुस्त्या तसेच लहान-मोठ्या 250 लढती होणार आहेत. विदेशी व भारतातील नामांकित मल्लांची निवड या कुस्ती महासंग्रामासाठी केली जाते. यावर्षी मैदानातील प्रथम क्रमांकाच्या लढतीसाठी इजिप्तचा आंतरराष्ट्रीय विजेता अहमद तौफीक व दुसऱ्या क्रमांकासाठी इजिप्तचा आंतरराष्ट्रीय विजेता सलाऊद्दीन अब्बास येणार आहेत.

वारणेच्या मैदानांत देश विदेशातील अनेक मल्लांनी मातीतील मैदानावर लढती करून आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकीक मिळविला आहे. दरम्यान, यंदा देश पातळीवर चमकलेले महाराष्ट्रामधील दहा ते अकरा मल्ल प्रथमच वारणेच्या मैदानात लढतीसाठी येणार असल्याचे डॉ. कोरे यांनी सांगितले. प्रथम क्रमांकाच्या जनसुराज्यशक्ती श्री किताबासाठी महाराष्ट्र केसरी किताब पटकावलेला सिकंदर शेख विरुद्ध अहमद तौफीक (इजिप्त) यांच्यात लढत प्रमुख आकर्षण असणार आहे. याशिवाय अकरा शक्ती श्री किताब लढती होणार आहेत. यावेळी वारणा कुस्ती केंद्राचे वस्ताद संदिप पाटील, दिलीप महापुरे, ईश्वरा पाटील उपस्थित होते.

प्रमुख किताबाच्या कुस्त्या अशा-

जनसुराज्यशक्ती किताब - महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख (गंगावेश) वि अहमद तौफीक (इजिप्त), वारणा साखर शक्ती- महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर) वि जागतिक विजेता सल्लाउद्दीन अब्बास (इजिप्त), वारणा दूध संघ शक्ती उपमहाष्ट्र केसरी माऊली कोकाटे (पुणे) विरुद्ध भारत केसरी भूपेंद्र अजनाळा (पंजाब), वारणा बॅक शक्ती उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर (गंगावेश) वि आंतरराष्ट्रीय विजेता दिनेश बुलिया (दिल्ली), वारणा दूध साखर वाहतूक शक्ती - राष्ट्रीय विजेता दादा शेळके (पुणे) वि राष्ट्रीय विजेता मनजीत खत्री (हरियाना), वारणा ऊस वाहतूक शक्ती रवि चव्हाण (पुणे) वि प्रविण चहर (दिल्ली), वारणा बिलट्यूब शक्ती श्री कार्तिक काटे (कर्नाटक) वि जॉटी भाटिया (दिल्ली), वारणा शिक्षण शक्ती संदिप मोटे (सांगली) वि पवनकुमार कुमार (पंजाब), वारणा बझार व वारणा महिला शक्ती समीर शेख (पुणे) वि मुन्ना (पुणे),  ई डी एफ मान शक्ती नामदेव केसरे  (वारणा) वि  अमितकुमार केसरे (उत्तरप्रदेश), वारणा नवशक्ती कालीचरण सोलनकर (गंगावेश) वि सतपाल सोनटक्के (टेभूर्णी).

Advertisement
Tags :

.