जगप्रसिद्ध वृक्ष
छायाचित्रणासाठी जगभरातून येतात फोटोग्राफर
अमेरिकेतील प्रांत ओरेगनच्या पोर्टलँड सिटीमध्ये पोर्टलँड जपानी गार्डन आहे. यात जगप्रसिद्ध लेस-लीफ मेपलचा एक वृक्ष असून तो स्ट्रोलिंग पाँन्ड गार्डनच्या तलावानजीक आहे. हा वृक्ष जगभरात प्रसिद्ध असून सध्या याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
सोशल मीडिया साइटवर हा व्हिडिओ एका युजरने पोस्ट केला आहे. या व्हिडिओत या आश्चर्यजनक वृक्षाचे सौंदर्य पाहून दंग व्हायला होते, कारण याच्या पानांचा रंग सोनेरी, पिवळा, नारिंगी आणि लाल रंगात दिसून येतात.
लेस-लीफ मेफत एक एसर पामेटम वृक्ष आहे. या वृक्षाचे वयोमान 65-70 वर्षांदरम्यान असावे. याचे रोप 1971 च्या आसपास लावण्यात आले असावे असे मानले जाते. लेस-लीफ मेपल वृक्ष सुमारे 10-15 फूट उंच आणि 8-12 फूट रुंद असू शकतो.
या वृक्षाची सर्वात मोठे वैशिष्ट्या म्हणजे याची पाने प्रत्येक ऋतूत रंग बदलत असतात. वसंत ऋतुत या पानांचा रंग लाल असतो, तर मग हा रंग हिरवा होत असतो. पानझडीच्या काळात याची पाने पिवळ्या, लाल किंवा नारिंगी रंगाची होत असतात. उन्हाळ्याच्या अखेरीस याला कांस्य धातूप्रमाणे रंग प्राप्त होत असतो. स्वत:च्या अजब सौंदर्यामुळे हा वृक्ष जगप्रसिद्ध ठरला आहे.
पानांचा रंग बदलत असल्याने हा वृक्ष अत्यंत सुंदर दिसून येतो. याच्या चहुबाजूला उद्यानाचे वातावरण असल्याने याच्या सौंदर्यात भर पडत असते. या वृक्षाला सर्वात सुंदर आणि फोटोजेनिक ठरविण्यात आले आहे. याचमुळे जगभरातील फोटोग्राफर याला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पोर्टलँड जपानी गार्डनमध्ये धाव घेत असतात. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर या वृक्षाची छायाचित्रे आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात.