For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर चाकू हल्ला करून दागिने लांबविले

11:15 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर चाकू हल्ला करून दागिने लांबविले
Advertisement

बैलहोंगल तालुक्यातील उडकेरी येथील घटना

Advertisement

बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील उडकेरी येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेवर चाकू हल्ला करून मंगळसूत्र पळविण्यात आले आहे. मंगळवारी पहाटे ही घटना घडली असून या घटनेने एकच खळबळ माजली आहे. विजयलक्ष्मी केंचाप्पा दोडली (वय 27) या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून दोडवाड, ता. बैलहोंगल पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे. घटनेची माहिती समजताच बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक, कित्तूरचे पोलीस निरीक्षक एम. एम. दप्पीन, दोडवाडचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कोटी व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मंगळवारी पहाटे विजयलक्ष्मी आपली मैत्रीण गीता हिच्यासोबत बैलहोंगल-सौंदत्ती रोडवर वॉकिंगसाठी गेल्या होत्या.  वॉकिंग करून घरी परतताना दुचाकीवरून आलेल्या दोघा जणांनी अर्वाच्च शिवीगाळ करीत ‘अंगावरील दागिने काढून दे’ असे कन्नडमध्ये धमकावले. ‘दागिने दिली नाहीस तर चाकूने हल्ला करू’ अशी धमकी दिली. विजयलक्ष्मी यांच्या मंगळसूत्राला त्याने हिसडा मारला. त्यावेळी त्यांनी एका हाताने ते घट्ट पकडले. मंगळसूत्राचा तुकडा खाली पडला. प्रसंगावधान राखून महिलेने मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. त्यामुळे चाकूने महिलेवर हल्ला करून मोटारसायकलवरून आलेल्या भामट्यांनी तेथून पलायन केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.