For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बीएमडब्ल्यूची झाडाला धडक बसून महिला ठार

11:06 AM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
बीएमडब्ल्यूची झाडाला धडक बसून महिला ठार
Advertisement

चारजण जखमी : कोडगई क्रॉसनजीक अपघात

Advertisement

वार्ताहर/रामनगर

हुबळी येथून वास्को-गोवा येथे जाणाऱ्या कारची (क्र. एमएच 02 ईझेड 7939) कोडगई येथील वळणावर झाडाला धडक बसून महिला जागीच ठार झाली. तर चौघेजण जखमी झाल्याची घटना बुधवारी घडली. सदर अपघात रामनगर-धारवाड मार्गावरील कोडगई क्रॉसनजीक घडला. खातून मुल्ला (वय 60, राहणार वास्को, गोवा) ही महिला जागीच ठार झाली. तर चांदणी मुल्ला (वय 30), अल्लाबक्ष मुल्ला (वय 39), आयार मुल्ला (वय 11) आणि 8 वर्षांची एक मुलगी जखमी झाली आहे. सर्व जखमींना बेळगाव येथे नेण्यात आले आहे. अपघातानंतर तातडीने जखमींना रामनगर येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरच उपलब्ध नसल्याने अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. अपघातग्रस्तांना दीड तासाहून अधिककाळ ताटकळत ठेवण्यात आले. पुढील उपचारासाठी गंभीर जखमी ऊग्णांना कोठे घेऊन जावे, हे सांगण्यासाठी जखमींच्या कुटुंबीयांना रामनगर दवाखान्यातील डॉक्टरांनी ताटकळत ठेवले. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.