For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

नोकरी सोडून महिलेने सुरू केले प्राणिसंग्रहालय

06:48 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
नोकरी सोडून महिलेने सुरू केले प्राणिसंग्रहालय

नवे आयुष्य स्वप्नवत असल्याचे वक्तव्य

Advertisement

9-5 ची नोकरी सोडल्यावर माझे जीवनच बदलून गेले आहे, आता मी प्रत्येक दिवसाचा आनंद घेत असल्याचे 35 वर्षीय लिन्सी मार्टिन हिचे सांगणे आहे. लिन्सीने लंडनमध्ये स्वत:चे प्राणिसंग्रहालय सुरू केले आहे. तिच्यासोबत 28 वर्षीय पार्टनर रयान आणि 11 महिन्यांचा मुलगा काई राहतो. संबंधित प्राणिसंग्रहालय 4 वर्षांपासून बंद होते.

या प्राणिसंग्रहालयात सुधारणा करत तिने ते पुन्हा सुरू केले आहे. मी स्वत:च्या मुलाला घेऊन प्राणिसंग्रहालयात जाते, तेथे प्राण्यांना अन्न भरविते, हे माझे नवे घर असल्याचा विश्वासच बसत नाही. जर चार वर्षांपूर्वी कुणी मला प्राणिसंग्रहालय चालविण्यासाठी स्वत:ची नोकरी सोडावी लागेल असे सांगितले असते तर मी विश्वासच ठेवला नसता असे लिन्सी सांगते.

Advertisement

लिन्सीची पार्टनर रयानसोबत ऑनलाईन भेट झाली होती. पहिली डेट ऑक्टोबर 2019 मध्ये झाली, त्याने प्राणिसंग्रहालयात काम केले होते. स्वत:चे प्राणिसंग्रहालय सुरू करण्याचे त्याचे स्वप्न होते. जून 2020 पासून आम्ही एकत्र राहत आहोत. त्यानंतर दोघांनीही प्राणिसंग्रहालय सुरू करण्याची योजना आखण्यास सुरुवात केल्याचे लिन्सीने सांगितले आहे.

Advertisement

मे 2021 पर्यंत हे केवळ एक स्वप्नच होते. परंतु नंतर एक जुने प्राणिसंग्रहालय विकले जाण्याची जाहिरात पाहिली. रयानने तेथे कित्येक वर्षांपूर्वी काम केले होते. यानंतर आम्ही हे प्राणिसंग्रहालय खरेदी केले.  स्वत:च्या दिवंगत वडिलांकडून वारशाच्या स्वरुपात प्राप्त रक्कम आणि रयानच्या बचतीतून प्राणिसंग्रहालयाचे नुतनीकरण केले, येथे तेव्हा कुठलाच प्राणी नव्हता. उद्यान खराब झाले होते. इमारतींची पडझड झाली होती असे लिन्सीने म्हटले.

यानंतर रयानने स्वत:ची नोकरी सोडून प्राणिसंग्रहालय सुधारण्यास सुरुवात केली. साफसफाई, गार्डनिंग आणि इमारतीसाठी मित्र आणि परिवाराची मदत घेतली. हातातील पैसा संपू लागल्यावर लोकांना हे सुधारकार्य दाखविण्यासाठी कम्युनिटी डे सुरू केले, याकरता प्रवेशशुल्क आकारले. येथे राहण्यासाठी घर देखील होते. यानतंर रयान यांनी अन्य प्राणिसंग्रहालयात जात प्राणी दान स्वरुपात देण्याचे आवाहन केले. प्रारंभी अनेक प्राणी मिळाले. डिसेंबर 2021 मध्ये मी स्वत:ची नोकरी सोडली. प्राणिसंग्रहालयाच्या कार्यालयात बसून प्राण्यांसाठी काम करू लागले.  फेब्रुवारी 2022 मध्ये प्राणिसंग्रहालय लोकांसाठी खुले झाले. येथे 40 कर्मचारी असून प्राण्यांची संख्या वेगाने वाढतेय. आता मुलासोबत प्राणिसंग्रहालयात फेरफटका मारण्याची मजाच औरच असल्याचे लिन्सी सांगते.

Advertisement
Tags :
×

.