For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Indian Woman Shot Dead अमेरिकेत भारतीय वंशाच्या महिलेची गोळ्या घालून हत्या...

03:33 PM May 26, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
indian woman shot dead अमेरिकेत भारतीय वंशाच्या महिलेची गोळ्या घालून हत्या
Advertisement

अमेरिकेतील व्हर्जिनिया येथील सुपर मार्केटमध्ये काम करणाऱ्या ४५ वर्षीय भारतीय वंशाच्या महिलेची हत्या करण्यात आली आहे. दरोड्याचा संशयास्पद प्रयत्न करताना महिलेवर हल्ला झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित महिला मेघनाबेन पटेल असून त्या गेल्या १० वर्षांपासून सुपरमार्केटमध्ये काम करत होत्या.घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी परिसर सील केला आणि तपास सुरू केला.हल्लेखोराला अटक करण्यासाठी विशेष पथकेही तैनात करण्यात आल्याचे वृत्त आहे.

घटना सीसीटिव्हीत कैद.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका  व्हिडिओमध्ये, एक माणूस ॲनिमल-प्रिंट पॅन्ट, पूर्ण बाह्यांचे जॅकेट, फेस मास्क आणि ग्लोव्हज घालून सुपरमार्केटमध्ये प्रवेश करताना दिसत आहे.

Advertisement

त्यानंतर तो माणूस आपले हात खिशात घालताना, एक मिनिटभर काउंटरसमोर रेंगाळताना आणि मग आपल्या जॅकेटमधून बंदूक बाहेर काढताना दिसतो. पटेल जमिनीवर कोसळताच हल्लेखार त्यांच्यावर दोनदा गोळी झाडतो आणि घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी शेवटची गोळी झाडण्यासाठी काउंटरवर उडी मारतो.

मेघनाबेन पटेल कोण होत्या?

'हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार, मेघनाबेन पटेल या गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील विजापूर भागातील जंत्राल गावच्या रहिवासी होत्या. त्यांच्या पश्चात पती उपेंद्रभाई पटेल, मुलगी नक्षी आणि मुलगा स्मिथ हे आहेत.

त्यांच्या आई-वडील, करसनभाई, आणि आई, कपिलाबेन, हे जंत्रालमध्ये राहत असल्याचे वृत्त आहे. मयत मेघनाबेल अत्यंत प्रेमळ आणि साध्या स्वभावाच्या होत्या, असे वृत्त डेली जागरणने गावकऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे.

Advertisement
Tags :

.