महिलेला दुर्लभ आजार
आई होण्याच्या मार्गात ठरला अडथळा
लिथुआनियाच्या एका 29 वर्षीय महिलेच्या कहाणीने वैद्यकीय जगतात खळबळ उडवुन दिली आहे. ही महिला अपत्याला जन्म देण्याचा प्रयत्न करत होती, परंतु अनेक वर्षांपर्यंत ती गरोदर राहू शकली नाही. दोनवेळा तिने आयव्हीएफचाही प्रयत्न केला, परंतु त्यातही यश आले नाही. प्रारंभी डॉक्टरांना कारण समजू शकले नाही. परंतु नंतर या महिलेला ह्यूमन सीमिनल प्लाझ्मा एलर्जी (एचएसपी) असल्याचे कळले. ही एक अत्यंत दुर्लभ स्थिती असुन जगभरात याचे केवळ 80 रुग्ण आढळून आले आहेत. लिथुआनियाच्या या 29 वर्षीय महिलेला अनेक वर्षांपर्यंत मूल जन्माला घालण्यास समस्या येत होती. ती स्वत:च्या जोडीदारासोबत गर्भधारणेचा प्रयत्न करत होती, परंतु यात यश येत नव्हते. यानंतर तिने आयव्हीएफची मदत घेतली, परंतु तेही अयशस्वी ठरले. गायनोकोलॉजिस्टने तपासणी केली, परंतु कुठलेच स्पष्ट कारण मिळाले नाही.
महिलेला पूर्वीपासून अस्थमा आणि एलर्जिक राइनाइटिसची समस्या होती, जी धूळ, मांजराचे केस आणि मोल्ड यासारख्या गोष्टींनी वाढत होती. याचमुळे ही एलर्जी प्रेग्नंसीला प्रभावित करत असावी असे तिला वाटले. ती एका एलर्जी तज्ञाकडे केली, जेथे तिच्या जीवनाचे एक अनोखे रहस्य खुले झाले आहे.

रक्तात इओसिनोफिल्स अधिक
रक्ताच्या तपासणीत महिलेच्या रक्तात इओसिनोफिल्स नावाच्या पांढऱ्या रक्तपेशींचे प्रमाण सामान्यपेक्षा अधिक असल्याचे कळले. या पेशी शरीराला अॅलर्जीपासून वाचविण्याचे काम करतात. नाकाच्या तपासणीत देखील इओसिनोफिल्स 29 टक्के आढळून आले (सामान्य प्रमाण 0-5 टक्के).
अनेक गोष्टींपासून अॅलर्जी
स्किन प्रिक स्टेटमधुन (ज्यात त्वचेवर छोटीशी टेस्ट करत अॅलर्जी चेक केली जाते) महिलेला धूळ, माइट्स, गवत आणि श्वानांच्या एलर्जन्सपासून अॅलर्जी असल्याचे कळले. खासकरून तिला कॅन एफ5 नावाच्या प्रोटीनपासून मोठी अॅलर्जी होती. हा प्रोटीन श्वानाच्या डँडर आणि मूत्रात आढळून येतो.
सीमिनल अॅलर्जीची पुष्टी
कॅन एफ5 प्रोटीनचा ह्यूमन सीमिनल प्लाझ्मेशी समानता असते. याचमुळे डॉक्टरांनी महिलेच्या पार्टनरची सीमिनल प्रिक टेस्ट केली. टेस्टमध्ये महिलेला ह्यूमन सीमिनल प्लाझ्मा अॅलर्जी असल्याची पुष्टी झाली. ही अॅलर्जी महिलांमध्ये अधिक दिसून येते, परंतु काही पुरुषांनाही ही अॅलर्जी असू शकते असे तज्ञांचे सांगणे आहे.