महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

झाडांशी ‘डेटिंग’ करणारी महिला

06:29 AM Nov 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोणत्या व्यक्तीला कशात स्वारस्य असेल, यासंबंधी निश्चित काही सांगता येणे कठीणच नव्हे, तर अशक्य आहे. प्रत्येकाला कशात ना कशात स्वारस्य असते. कशाची ना कशाची आवड असते. जोपर्यंत या आवडीनिवडी सर्वसामान्य आणि सर्वसंमत असतात, तोपर्यंत त्यांची चर्चा होत नाही. तथापि, असे आवडीचे विषय असामान्य किंवा अनोखे असतात तेव्हा ते आवश्य चर्चेचा विषय बनतात.

Advertisement

एक युवती अशी आहे, की जिला पुरुषांसंबंधी कोणतेही आकर्षण वाटत नाही. मात्र तिची एका रोपट्याशी गट्टी आहे. इतकी, की ती जणू या रोपट्याच्या प्रेमातच पडली आहे. ही युवती कोठेही गेली तरी त्या रोपट्याला स्वत:समवेत ठेवते. तिने स्वत:च यासंबंधीचा व्हिडीओ प्रसारित केला असून असंख्य लोकांनी तो पाहिला आहे. या रोपट्याच्या सान्निध्यात तिला परमसुखाचा अनुभव येतो, असे तिचे म्हणणे आहे. या युवतीचे नाव या व्हिडीओवरुन समजू शकत नाही. पण ती युरोपमधी कोणत्या तरी देशाची असावी, असा व्हिडीओ बघणाऱ्यांचा कयास आहे.

Advertisement

या रोपट्यासह रात्र घालवायला आपल्याला आवडते. या रोपट्यासमवेत मी डेटिंग करते. त्याच्यासह सहलीला जाते. हा प्रकार अनेक दिवसांपासूनचा आहे. प्रथम आपल्याला आपले हे जगावेगळे प्रेम उघड करण्यास भीती वाटत होती. लोक काय म्हणतील याची चिंता होती. पण आता आपण आपल्या या रोपटेप्रेमाचा व्हिडीओ पोस्ट करुन जगाला याची माहिती देण्यास आपल्याला संकोच वाटत नाही, असे तिचे म्हणणे आहे. आपल्याला मात्र, ‘ऐकावे ते नवलच’ एवढेच ही युवती आणि ती ज्याच्या प्रेमात पडली आहे ते  रोपटे यांच्यासंबंधी म्हणता येईल.

 

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article