For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

भारताचा विजयी शेवट, क्युबावर 6-4 ने मात

06:58 AM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारताचा विजयी शेवट  क्युबावर 6 4 ने मात
Advertisement

फिफा यू-15 वर्ल्ड कप आणि महोत्सव

Advertisement

वृत्तसंस्था/ बाकू

फिफा यू-15 विश्वचषक आणि महोत्सवातील आपला प्रवास भारताने शुक्रवारी क्युबावर 6-4 असा विजय मिळवून यशस्वीरीत्या पूर्ण केला.

Advertisement

या स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीत सहभागी झालेल्या 189 देशांपैकी भारताने 87 वे स्थान मिळवले. भारतीय संघाच्या विजयात व्हिक्टर लालवमपुइया (पहिल्या आणि 23 व्या मिनिटाला), निबास मीतेई वाहेन्गबम (6 व्या आणि 22 व्या मिनिटाला) आणि आर. लालरेमरुआतफेला (12 व्या आणि 27 व्या मिनिटाला) यांनी प्रत्येकी दोन गोल केले. स्पर्धेतील हा भारताचा 10 वा आणि शेवटचा सामना होता.

एका टप्प्यावर भारत 6-1 असा आघाडीवर होता, मात्र त्यानंतर क्युबाने तीन गोल करत फरकाचे अंतर कमी केले. ब्लू कोल्ट्सने या स्पर्धेत लाओस, कॅमेरुन, बहरीन, त्रिनिदाद आणि टोबॅगो तसेच क्युबाविरुद्ध विजय मिळवले. त्यांना सेनेगल, होंडुरास, अफगाणिस्तान आणि कझाकस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला तर ग्रेनाडाविरुद्धचा सामना अनिर्णित राहिला.य् ाा कामगिरीसह भारत 87 व्या क्रमांकावर राहिला.

Advertisement
Tags :

.