मुंबईविरुद्ध आज हैदराबादला विजय अत्यावश्यक
वृत्तसंस्था/ मुंबई
`````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````````आयपीएल गुणतालिकेत 10 सामन्यांतून सहा विजय आणि चार पराभवांसह 12 गुण मिळवून चौथ्या स्थानावर असलेले हैदराबाद अष्टपैलू प्रदर्शन घडविण्यासाठी आणि विशेषत: गोलंदाजी विभागात सुधारणा करण्यासाठी उत्सुक असेल.
अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळविण्यासाठी शर्यत तीव्र झालेली असून पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघ हा राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्या खाली विसावलेला आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि पुनरागमन केलेला दिल्ली कॅपिटल्स यांच्यापासूनही सनरायझर्सला धोका आहे. त्यामुळे सनरायझर्सला तीव्र लढाईसाठी तयार व्हावे लागणार आहे. त्यांचे फलंदाज आज वानखेडेवर नेहमीप्रमाणे मुक्तपणे फटकेबाजी करून मोठी धावसंख्या उभारण्यास उत्सुक असतील. येथील खेळपट्टी सामान्यत: फलंदाजीसाठी अनुकूल असते.
राजस्थान रॉयल्सला मागील सामन्यात फक्त एका धावेने पराभूत केल्यामुळे सनरायझर्सचा आत्मविश्वास उंचावलेला असेल. ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि हेन्रिक क्लासेन हे त्यांचे फलंदाजीतील आधारस्तंभ आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम मोठी धावसंख्या उभारण्यास उत्सुक असेल. फलंदाज नितीशकुमार रे•ाr हा गेल्या काही सामन्यांमध्ये सर्वांत आशादायक खेळाडूंपैकी एक म्हणून उदयास आला आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजनची अचूकता ही त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल.
शनिवारी रात्री रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने गुजरात टायटन्सवर मात केल्याने पाचवेळचा विजेता मुंबई इंडियन्सचा संघ पुन्हा घसरून तळाशी पोहोचला आहे. 11 सामन्यांमध्ये केवळ तीन विजयांसह त्यांचे आव्हान संपले आहे. तथापि, आगामी टी-20 विश्वचषकासाठी निवडण्यात आलेले प्रमुख भारतीय खेळाडू, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांच्या वैयक्तिक फॉर्मवर सारे लक्ष केंद्रीत राहील.
रोहितच्या आक्रमक खेळाला अनेक वेळा मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही, तर सूर्यकुमारने केकेआरविऊद्ध सुरेख अर्धशतक झळकावलेले असले, तरी तो सातत्य राखू शकतो की नाही हे पाहावे लागेल. भारताचा उपकर्णधार पंड्याची गोलंदाजी व फलंदाजीतही सुमार कामगिरी झाली आहे. त्यामुळे होत असलेल्या टीकेचा शेवट करण्यास तो उत्सुक असेल.
संघ : मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, जसप्रीत बुमराह, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, टीम डेव्हिड, श्रेयस गोपाल, इशान किशन, अंशुल कंबोज, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, क्वेना मफाका, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, नमन धीर, शिवलिक शर्मा, रोमॅरियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, तिलक वर्मा, हार्विक देसाई, नेहल वढेरा, ल्यूक वूड.
सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, हेन्रिक क्लासेन, एडन मार्करम, अब्दुल समद, नितीश रे•ाr, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी. नटराजन, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंग, ग्लेन फिलिप्स, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, उपेंद्र यादव, जाथवेध सुब्रमण्यन, सनवीर सिंग, विजयकांत व्ही., फजलहक फाऊकी, मार्को जेनसेन, आकाश महाराज सिंग, मयंक अग्रवाल.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वा.