Satara News | ८ दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी; अखेर ड्युटीवर असलेल्या 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची प्राणज्योत मालवली!
दुशेरे : कर्तव्य बजावत असताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले कासेगाव पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सतीश - शिवाजी मुळे (वय ५०) यांचे उपचारादरम्यान कृष्णा रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाच्या - वृत्ताने कराड तालुक्यासह वडगाव हवेली परिसरावर शोककळा पसरली.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक - सतीश मुळे हे कासेगाव पोलीस - ठाण्यात नेमणुकीस होते. २३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.३५वाजण्याच्या सुमारास कासेगाव एसटी स्टँडसमोरील महामार्गावर कर्तव्यावर असताना त्यांना भरधाव वाहनाने धडक दिली होती. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. सतीश मुळे यांनी पोलीस दलात तब्बल ३२ वर्षे सेवा बजावली. सतीश मुळे हेकराड तालुक्यातील वडगाव हवेली गावचे सुपुत्र होते. आठवडाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच वडगाव हवेली गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, भाऊ आणि वहिनी असा परिवार आहे. कर्तव्य बजावताना झालेल्या अपघातानंतर जीवन-मृत्यूशी झुंज देण्प्रया सतीश मुळे यांची आज उपचारादरम्यान झालेली एक्झिट त्यांच्या कुटुंबीयांसह सहकाऱ्यांसाठी चटका लावणारी ठरली आहे.