For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सत्य घटनेवर येतेय वेबसीरिज

06:45 AM Aug 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
सत्य घटनेवर येतेय वेबसीरिज
Advertisement

हाय व्हॅल्यू टार्गेट : द हंट फॉर सद्दाम लवकरच

Advertisement

सत्यघटनांवर आधारित वेबसीरिज निर्माण करण्याचे सत्र मागील काही काळापासून दिसून येत आहे. याप्रकरणी हॉलिवूड आघाडीवर असते. आगामी काळात ‘हाय व्हॅल्यू टार्गेट : द हंट फॉर सद्दाम“ वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जोएल किन्नामन यांची मुख्य भूमिका असलेली ही पॉलिटिकल थ्रिलर सीरिज सद्दाम हुसैनच्या अटकेच्या प्रकरणाला दर्शविणारी आहे. या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यासोबत निर्मात्यांनी याच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे.

हाय व्हॅल्यू टार्गेट : द हंट फॉर सद्दामचा ट्रेलर टीएनटी ड्रामाने स्वत:च्या अधिकृत एक्स हँडलवर शेअर केला आहे. या सीरिजमध्ये अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएचे विश्लेषक जॉन निक्सन (जोएल किन्नामन) यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. त्यांची व्यक्तिरेखा या वेबसीरिजमध्ये जोएलने साकारली आहे. याचबरोबर यात दुसरी महत्त्वाची व्यक्तिरेखा सद्दाम हुसैनची आहे, जी अभिनेता वलीद जुएटर साकारत आहे. या सीरिजमध्ये सद्दाम हुसैनला 2003 साली झालेली अटक आणि सीआयए अधिकारी जॉन निक्सन यांच्याकडून त्याच्या चौकशीच्या वास्तविक घटनाक्रमाची कहाणी मांडण्यात येणार आहे.  ही सीरिज सीआयएचे माजी विश्लेषक जॉन निक्सन यांच्याकडून लिखित पुस्तक ‘डिब्रिफिंग द प्रेसिडेंट :द इंटरोगेशन ऑफ सद्दाम हुसैन“वर आधारित आहे. ‘हाय व्हॅल्यू टार्गेट : द हंट फॉर सद्दाम हुसैन“ सीरिज 13 सप्टेंबर रोजी टीएनटी प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन स्ट्रीम करण्यात येणार आहे. 8 एपिसोड्सच्या सीरिजची निर्मिती डॅनियल स्टीपलमॅन आणि जोनाथन वेकहॅम यांनी मिळून केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.