पोहणारा नव्हे चालणारा शार्क
पापुआ न्यू गिनीमध्ये मिळाली नवी प्रजाती
शार्कचे नाव ऐकताच समुद्रातील एक धोकादायक शिकारी डोळ्यांसमोर येतो. परंतु वैज्ञानिकांनी आता एका अशा शार्कची ओळख पटविली आहे, जो पोहण्यासोबत चालूही शकतो. पापुआ न्यू गिनीच्या किनारी भागात मिळालेल्या या नव्या प्रजातीला वॉकिंग शार्क म्हटले जातेय. हा स्वत:च्या पेक्टोरल फिनचा वापर पायांप्रमाणे करतो. कमी पाण्यात आणि कोरल रीफच्या वर चालतो.
पापुआ न्यू गिनीच्या मिल्ने बे क्षेत्रात राहणारे लोक या अनोख्या शार्कला दीर्घकाळापासून पाहत आले आहेत. स्थानिक भाषेत याला कोडडेकेडेवा म्हटले जाते. ज्याचा अर्थ डॉग शार्क किंवा आळशी शार्क असा होतो. परंतु स्थानिक लोकांसाठी ही नवी गोष्ट नव्हती. पण वैज्ञानिकांनी आता याची औपचारिक ओळख पटवत याला नवी प्रजाती घोषित केले आहे. हा शार्क हेमिस्किलियम जीनसचा हिस्सा आहे, ज्याला सर्वसाधारणपणे वॉकिंग शार्क किंवा एपॉलेट शार्क म्हटले जाते. आतापर्यंत या समुहाच्या 9 प्रजाती वैज्ञानिकांच्या नोंदीत होत्या, आता ही संख्या वाढून 10 झाली आहे. या नव्या प्रजातीचे नाव हेमिस्किलियम डजियन ठेवण्यात आले आहे. याचे नाव ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिक क्रिस्टिन डजियन यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले आहे. ज्या याची ओळख पटविणाऱ्या संशोधन पथकाच्या हिस्सा होत्या.
मार्च 2025 मध्ये वैज्ञानिकांची एक टीम मिल्ने बेच्या सागरी क्षेत्रात सर्वेक्षण करत होती. याचदरम्यान सुमारे एक मीटर खोल पाण्यात त्यांना एक शार्क दिसून आला. प्रारंभी टीम अन्य प्रजातीचा शोध घेत होती. परंतु या शार्कचा रंग आणि शरीरावरील खुणा उर्वरित वॉकिंग शार्कपेक्षा वेगळ्या दिसून आल्या. नंतर टीमने अनेक आणखी नमुने जमवून त्यांच्या डीएनएची तपासणी केली. डीएनए तपासणीतून हे पूर्वीपासून परिचित कुठल्याही वॉकिंग शार्कपेक्षा वेगळे असल्याची पुष्टी झाली.
काय आहे वैशिष्ट्या?
वॉकिंग शार्क स्वत:चे पेक्टोरल आणि पेल्विक फिनच्या मदतीने समुद्राच्या तळावर पुढे जाऊ शकतो. ओहोटीच्या वेळी कमी पाणी, कोरल रीफ आणि सागरी गवतयुक्त भागांमध्ये हा सहजपणे फिरतो. हा मुख्यत्वे तळाशी राहणारे छोटे जीव आणि इनवर्टीब्रेट्सना खात असतो. नव्या प्रजातीच्या शरीरावर छोटेछोटे डॅश खुणा आहेत, ज्या ब्रेल लिपिच्या कोडप्रमाणे दिसतात. हाच पॅटर्न इतर वॉकिंग शार्कपेक्षाला याला वेगळा ठरवितो.
शार्कची ही नवी प्रजाती केवळ पापुआ न्यू गिनीच्या मिल्ने बे भागातच आढळत असल्याचे वैज्ञानिकांचे मानणे आहे. समुद्र किनारी होत असलेले बदल आणि त्यांचा अधिवास कमी झाल्याने या शार्कची संख्या घटू शकते. जर वेळीच याच्या संरक्षणासाठी पावले उचलण्यात न आल्यास ही प्रजाती विलुप्त होऊ शकते असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. नव्या प्रजातीच्या शोधासोबत जगात नोंद वॉकिंग शार्कची संख्या 10 झाली आहे. हा शोध पापुआ न्यू गिनीच्या समुद्र सागरी जैवविविधतेला समोर आणेल, जेथे अद्याप अनेक सागरी जीवांविषयी नवी माहिती समोर येत आहे असे वैज्ञानिकांचे मानणे आहे.