आरामात फिरता येणारा ज्वालामुखी
येथे जीवाला नाही कुठलाच धोका
ज्वालामुखी म्हटल्यावर लाव्हारसाचा प्रवाह त्यातून बाहेर पडत असल्याचे चित्र डोळ्यांसमोर येते. ज्वालामुखी अत्यंत धोकादायक असतात, जर एखाद्या सक्रीय ज्वालामुखीत माणूस किंवा कुठलाही जीव पडला तर क्षणार्धात त्याची राख होते. परंतु जर एखाद्या ज्वालामुखीत माणसाला फिरता येत असल्यास काय घडेल? मेक्सिकोत एक असा ज्वालामुखी आहे, ज्याच्या आत लोक फिरण्यासाठी जात असतात. याच्या आत गेल्याने मानवी जीवाला कुठलाच धोका नसतो. मेक्सिकोच्या पुएबला शहरात ला लिबर्टैड नावाची एक वस्ती आहे. येथे क्युएक्सकोमेट नावाचा एक ज्वालामुखी असून याला शतकांपर्यंत लोक जगातील सर्वात छोटा ज्वालामुखी मानत होते. परंतु प्रत्यक्षात हा एक ज्वालामुखी नसून सिलिका आणि कॅल्शियम कंपाउंडने निर्मित एका डोंगरासारखी रचना आहे. 1064 मध्ये एक जागृत ज्वालामुखी पोपोकॅटेपेटलमध्ये विस्फोट होत त्यातून बाहेर पडणारा पदार्थ मुखावर जमा झाला असेल लोकांचे मानणे हेत.
हा एक गीझर राहिला असेल, ज्याला उष्ण पाण्याचा नैसर्गिक स्रोत मानले जाते. एटलस ऑब्सक्योरा वेबसाइटनुसार अखेरच्या वेळी हा ज्वालामुखी 1600 च्या आसपास जागृत झाला असेल, तेव्हापासून हा ज्वालामुखी निष्क्रीय झाला आहे. आता हा ज्वालामुखी 43 फूट उंच झाला असून 75 फूटांपर्यंत फैलावलेला आहे. यात आत पोकळी असून त्यात 23 फुटांचे मुख असून यात लोखंडी जिना लावण्यात आला आहे. येथे मोठ्या संख्येत पर्यटक येत असतात आणि याच्या आत उतरून येथील दृश्याचा आनंद घेत असतात.
जुन्या काळात मानवी बळी
1970 मध्ये या ज्वालामुखी बाहेर एक फलक लावण्यात आला होता. त्यावर 1585 च्या काळासंबंधी माहिती लिहिण्यात आली होती. आत दुर्गंधीयुक्त पाणी असून त्या काळात लोक येथे मानवी बळी द्यायचे आणि जे लोक आत्महत्या करायचे, त्यांचे मृतदेह येथे फेकले जात होते. या शहरात हे आता लोकप्रिय पर्यटन स्थळ ठरले आहे.