For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लैंगिक गुन्हेगारांनी भरलेले गाव

06:45 AM Jan 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
लैंगिक गुन्हेगारांनी भरलेले गाव
Advertisement

 शिक्षा भोगून झाल्यावर शांतपणे जगत आहेत आयुष्य 

Advertisement

अमेरिकेच्या फ्लोरिडा प्रांतात एक अनोखे गाव असून याचे नाव ‘मिरेकल व्हिलेज’ म्हणजेच ‘चमत्कारी गाव’ आहे. या गावाचे वैशिष्ट्या म्हणजे येथे राहणाऱ्या 200 लोकांपैकी जवळपास निम्मे लोक लैंगिक गुन्ह्यांमध्ये दोषी आढळले होते आणि अलिकडेच तुरुंगातून मुक्त झालेले आहेत.

अमेरिकेत लैंगिक गुन्हेगारांसाठी अत्यंत कठोर कायदे आहेत. तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्यांना कुठलीही शाळा, उद्यान किंवा बसस्टॉपनजीक राहण्याची अनुमती नसते. याचमुळे बहुतांश लोकांना घर मिळू शकत नाही आणि ते बेघर होतात. य्ही समस्या पाहता 2009 साली पाद्री डिक विदरो यांनी या गावाची सुरुवात केली. येथे हिंसेशिवाय लैंगिक गुन्हे पेलेले लोक राहू शकतात, यातील काही लोकांची प्रेयसी ही अल्पवयीन होती.

Advertisement

या गावात राहण्यासाठी काही कठोर नियम आहेत. ज्या लोकांनी हिंसा केली आहे, त्यांना येथे स्थान मिळत नाही. मुलांसोबत गुन्हा करणाऱ्यांनाही येथे राहता येत नाही तसेच मुलांनी युक्त परिवारांना येथे वास्तव्य करता येत नाही. गावात लोक अत्यंत सामान्य जीवन जगतात. ते सकाळी उठून कामावर जातात आणि स्वत:चे घर सांभाळतात. काही लोकांना रागावर नियंत्रण मिळविण्याचे प्रशिक्षणही मिळते. जे लोक अद्याप न्यायालयाच्या देखरेखीत आहेत, त्यांचे समुपदेशन केले जाते.

या गावाच्या आसपास राहणारे अनेक लोक मात्र या पूर्वाश्रमीच्या गुन्हेगारांबद्दल घाबरून असतात. मिरेकल व्हिलेज आता अहिंसक लैंगिक गुन्हेगारांना सुरक्षित आश्रय प्रदान करते. या गावात राहण्यासाठी दर आठवड्याला जवळपास 24 अर्ज प्राप्त होतात. या अर्जांची छाननी करत हिंसा किंवा ड्रग्जचा इतिहास असलेले किंवा मुलांचे लैंगिक शोषण केलेल्या गुन्हेगारांना वगळण्यात येते. येथे राहणाऱ्या काही गुन्हेगारांना तर स्थानिक शहरांमध्ये नोकरीही मिळाली आहे. या गावाच्या स्थापनेनंतर येथे एकही नवा लैंगिक गुन्हा घडलेला नाही. लोकांना योग्य संधी मिळाली तर ते स्वत:च्या चुकांमधून धडा घेत चांगले जीवन जगू शकतात हे या गावाने सिद्ध केले आहे.

Advertisement
Tags :

.