महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हिंडलग्यातील तरुणाचा डेंग्यूने बळी?

06:55 AM Jun 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आठवड्याभरातील दुसरा प्रकार, रुग्णसंख्येत वाढ

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

लक्ष्मीनगर-हिंडलगा येथील एका तरुणाचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. बेळगाव परिसरात केवळ आठवडाभरात डेंग्यूने दोघा जणांचा बळी गेला असून सरकारी व खासगी इस्पितळात डेंग्यू रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे.

प्रसाद मुचंडीकर (वय 28) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. काही दिवसांपासून हा तरुण आजारी होता. शुक्रवारी त्याला खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आजी, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

मंगळवार दि. 25 जून रोजी गोजगा, ता. बेळगाव येथील गणेश जंगम (वय 17) या विद्यार्थ्याचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. या घटनेला चार दिवस उलटले नाहीत तोच हिंडलगा येथील तरुणाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी पोटदुखी व अशक्तपणामुळे हा तरुण उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल झाला होता.

यासंबंधी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता खासगी इस्पितळाशी संपर्क साधून प्रसादचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याची माहिती घेत येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. डेंग्यू रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे जरुरी आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article