For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युवतीच्या थडग्यात मिळाले पात्र

07:00 AM Jan 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
युवतीच्या थडग्यात मिळाले पात्र
Advertisement

उत्खननात अनेकदा चकित करणाऱ्या गोष्टी आढळतात. इंग्लंडच्या लिंकनशायरमध्ये देखील असेच घडले आहे. तेथील स्क्रेम्बी गावात सहाव्या शतकातील युवतीचे थडगे आढळून आले होते. ही युवती सुमारे 1500 वर्षांपूर्वी मृत्युमुखी पडली होती. परंतु तिच्या थडग्यासोबत एक बहुरंगी पात्र सापडले असून ते मद्यपानासाठीचे असावे असे मानले जाते. वैज्ञानिक याचा रंग आणि स्वरुप पाहून थक्क झाले आहेत.

Advertisement

हे पात्र रोमन युगातील असून ते चिनीमातेने तयार करण्यात आले होते. शेफील्ड विद्यापीठाचे पुरातत्व तज्ञ ह्यूग विलमॉट यांनी हे पात्र एका सामान्य थडग्यात सापडले असले तरीही याचे स्वरुप अनोखे असल्याचे म्हटले आहे. हे पात्र अखेर या युवतीच्या थडग्यासोबत का दफन करण्यात आले असा प्रश्न उपस्थित झाला आहे. युरोपियन जर्नल ऑफ आर्कियोलॉजीत प्रकाशित अहवालात विलमॉट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या शोधाविषयी पूर्ण तपशील दिला आहे. हे पात्र 2018 मध्ये अन्य  एका दफनभूमीत आढळून आले होते. हे पात्र अत्यंत चांगल्या अवस्थेत आहे. हे पात्र युवतीच्या डोक्यावर ठेवण्यात आले होते. तसेच दोन ब्रोचही देण्यात आले होते. ब्रोच एक प्रकारचे पिन असते.

हे पात्र 2.2 इंच लांबीचे असून यात 280 मिलिलिटर पाणी भरले जाऊ शकते. हे पात्र तांबे आणि मिश्र धातूंनी तयार करण्यात आले आहे. यात चंद्र आणि हृदयाच्या आकाराच्या संरचना आहेत. मग लाल, अॅक्वामरीन आणि दाट निळ्या-जांभळ्या रंगाने इनेमल भरण्यात आले आहे. पात्राची शैली पाहता ते रोमन काळादरम्यान फ्रान्स किंवा ब्रिटनमधून मागविण्यात आले असावे असे वाटत असल्याचे पुरातत्व तज्ञांनी म्हटले आहे.

Advertisement

खास वापर

पात्राला पाण्याच्या भांड्याच्या स्वरुपात तयार करण्यात आले होते. रोमन लोक यातून मद्य प्राशन करत असतील. थडग्यात ठेवण्यासाठी हे पात्र निवडण्यात आल्याने त्यामागील उद्देश वेगळा असेल. मद्यपात्राला युवतीसोबत का दफन करण्यात आले हे समजून घेण्यासाठी विल्मॉट आणि सहकाऱ्यांनी याच्या कार्बनिक अवशेषांचे विश्लेषण केले. यातून चकित करणारा निष्कर्ष समोर आला. यात लिपिडचे अधिक प्रमाण आढळले, जे बहुधा डुकराच्या चरबीद्वारे तयार करण्यात आले हेते. संबंधित युवती लोकांवर उपचार करत असावी, या पात्राचा ती याकरता वापर करत असावी, याचमुळे हे पात्र दफन करण्यात आले असावे असे तज्ञांनी म्हटले.

Advertisement
Tags :

.