अत्यंत रहस्यमय ठिकाण
खडकांवर हातोडा मारल्यास येथे घंटेसारखा आवाज
अमेरिकेच्या पेंसिल्वेनियाच्या अपर ब्लॅक एडी गावात एक अत्यंत रहस्यमय जागा आहे. याचे नाव रिंगिंग रॉक्स पार्क आहे, कारण येथील खडकांवर हातोड्यासारखे कुठल्याही गोष्टीने वार केल्यास अनोखा ध्वनी ऐकू येतो. हा ध्वनी एखादे सांगितिक वाद्य किंवा लोखंडी घंटेप्रमाणे असतो. प्रत्येक खडकातून वेगळ्या प्रकारचा ध्वनी ऐकू येत असल्याचे सांगण्यात येते, अखेर या खडकांमधून हा आवाज का येता हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. आता याच खडकांशी निगडित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत या खडकांमधून कशाप्रकारचा आवाज ऐकू येतो हे दिसून येते. रिंगिंग रॉक्स पार्क या नावाने ओळखले जाणारे हे खडकाळ क्षेत्र 7 एकरच्या वनक्षेत्रात फैलावलेले आहे. तसेच दगडांनी भरलेले हे ठिकाण 10 फुटांपेक्षा अधिक खोल आहे.
अशाप्रकारच्या खडकांना सोनोरस खडक किंवा लिथोफोनिक खडक म्हटले जाते, कारण या खडकांवर वार केल्यास घंटेसारखा आवाज ऐकू येऊ लागतो. रिंगिंग रॉक्स पार्कमध्ये या खडकांमधून निघणारा अद्भूत ध्वनी ऐकण्यासाठी मोठ्या संख्येत लोक पोहोचत असतात. काही लोक खडकांची क्षमता आजमावून पाहण्यासाठी स्वत:सोबत हातोडा घेऊन येत असतात. खडकांवर त्याद्वारे वार करत निघणारा आवाज ऐकण्याची इच्छा ते पूर्ण करत असतात. रिंगिंग रॉक्स पार्कमध्ये खडकांमधून येणाऱ्या आवाजामागील अचूक कारण अद्यापही विज्ञानासाठी एक रहस्य आहे. परंतु या खडकांमधून येणारा ध्वनी हा त्यांच्या विशिष्ट संरचनुमळे निर्माण होत असल्याचे काही जणांचे सांगणे आहे. तर ही घटना खडकांमधील लोखंडाच्या उच्च प्रमाणामुळे होत असल्याचा दावा लेखिका मार्सिया बोंटा यांनी केला आहे.