Kolhapur : वडापचे वाहन भर बाजारात घुसले ; एका महिलेचा जागीच मृत्यू !
गंगावेशमध्ये भीषण अपघात ; अनियंत्रित वडाप बाजारात घुसला
कोल्हापुर : कोल्हापुरातील गंगावेश परिसरात आज दुपारी एक भीषण अपघात घडला. शाहू उद्यानाजवळ एका अनियंत्रित वडाप वाहनाने थेट बाजारात घुसून थैमान घातले. या घटनेत एक महिलेचा मृत्यू झाला असून, एक पुरुष गंभीर जखमी झाला आहे.
अपघातानंतर घटनास्थळी भयानक दृश्य निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन मदतकार्य सुरू करून . जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची स्थिती गंभीर आहे, अशी माहिती समोर येत आहे
अपघातात मरण पावलेली व्यक्ती ही महिला असून तिची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनास्थळी जुना राजवाडातील पोलीस दाखल झाले असून, वाहनचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . या घटनेचा पुढील जुना राजवाडा तपास पोलीस करत आहेत . या घटनेमुळे परिसरात काहीकाळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते