अमेरिकेत निर्माण होतेय वैदिक गाव
कानाकोपऱ्यात दिसते सनातनची झलक
अमेरिकेच्या शहरांमध्ये राहणारे लोक एकाकीपणाला तोंड देत असतात. शेजाऱ्यांपासून अजाण असतात. फास्ट लाइफ, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड आणि वेस्टर्न लाइफ स्टाइलशी निगडित आजारांनी त्रस्त असतात. अशास्थितीत ते भारतीय गावांच्या जीवनशैलीनुसार जीवन जगू इच्छितात. अमेरिकेत याच संकल्पाला मूर्त रुप देण्यासाठी वैदिक व्हिलेज साकारले जात आहे. हे वैदिक व्हिलेज अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनाच्या विंस्टन स्लेम शहरात निर्माण होणार आहे.
215 एकरची सोसायटी निर्माण होणार असून यात 180 घरे असतील. गावाच्या मध्यभागी एक मंदिर असेल. मंदिरातील आरती-शंखनाद आणि घंटीच्या ध्वनीने सकाळची सुरुवात होईल. अमेरिकेत हे वैदिक व्हिलेज भारतीय वंशाचे उद्योजक प्रकाश बुचीरे•ाr वसविणार आहेत. बुचीरे•ाr हे तेलंगणातील निसर्गसमृद्ध भागात लहानाचे मोठे झाले होते. अमेरिकेच्या जीवनपद्धतीला सोडून लोक भारतीय गावांसारखे समाधान शोधू इच्छितात. हे वैदिक व्हिलेज 2028 च्या अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे बुचीरे•ाr यांचे सांगणे आहे.
इमारतींची नावे संस्कृतमध्ये
215 एकरमध्ये वसणाऱ्या या सोसायटीच्या इमारतींची नावे संस्कृत भाषेतून घेण्यात आली आहेत. 110 घरांचे बुकिंग मार्च 2026 मध्येच झाले होते. प्रत्येक घरासमोर शेत असेल, हिरवाई, शेती आणि मनोरंजनाची साधने उपलब्ध असतील. नॉर्थ कॅरोलिनाच्या विंस्टन स्लेममध्ये वसणाऱ्या या सोसायटीचा पूर्ण प्रकल्प सुमारे 717 कोटी रुपयांचा आहे.
नॉर्थ कॅरोलिनाच्या विंस्टन स्लेम शहरात वैदिक व्हिलेजचा प्रकल्प यशस्वी ठरल्यावर आता जॉर्जियामध्ये वृंदावनम आणि टेनेसीमध्ये ‘वानप्रस्थ’ यासारखी गावे वसविली जाणार आहेत. वानप्रस्थ गाव निवृत्त लोकांसाठी असेल. भारतीय संस्कृतीच्या अनुरुपच ते वसविले जाणार आहे. या वैदिक व्हिलेजमध्ये लोक जमिनींची खरेदी करत आहेत. या गावांमध्ये अमेरिकेच्या गावांनुसार सुविधा असतील. परंतु त्या भारतीयत्वाची जाणीव करून देणाऱ्या असतील. फास्ट फूड या वैदिक गावांमध्ये उपलब्ध नसेल. लोक मंदिरांमध्ये पूजा-अर्चना करतील. लोकांशी गाठीभेटी घेत राहतील तसेच एकत्र बसून चहा पिऊ शकतील आणि यामुळे एकाकीपणा दूर होईल.