For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खेड शहर शिवसेनेच्या नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल

11:37 AM Sep 25, 2025 IST | Radhika Patil
खेड शहर शिवसेनेच्या नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल
Advertisement

खेड :

Advertisement

शहर शिवसेनेच्या वतीने श्री शंकर मंदिराजवळ नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. दररोज दांडिया नृत्याविष्कार पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. शहरप्रमुख कुंदन सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली शारदा देवीची नैमित्तिक पूजा व आरतीसह धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू राहणार आहे.

यामध्ये दररोज सकाळी 8.30 वाजता देवीची नैमित्तिक पूजा व आरती होईल. सायंकाळी 6 वाजता महाआरती व धुपारती झाल्यानंतर रात्री 8 वाजता दांडिया नृत्य होईल. 26 रोजी सायंकाळी 6 वाजता तांबुलाभिषेक व धुपारती, रात्री 8 वाजता दांडिया नृत्य होईल. याप्रसंगी मराठी अभिनेत्री अनुष्का सरकटे उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

27 रोजी सायंकाळी 6 वाजता तुलसीअर्चन अभिषेक, धुपारती, रात्री 8 वाजता दांडिया नृत्य होईल. मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वे उपस्थित राहणार आहेत. 28 रोजी पूजा व आरती, सायंकाळी 6 वाजता 108 भोग व धुपारती, रात्री 8 वाजता दांडिया नृत्य होईल. मराठी अभिनेता सौरभ गोखले उपस्थित राहणार आहेत. 29 रोजी सकाळी 9 वाजता नवचंडीयाग, सायंकाळी 6 वाजता फलारपण अभिषेक व धुपारती, रात्री 8 वाजता दांडिया फॅन्सीड्रेस स्पर्धा वयोगटानुसार होईल. 30 रोजी पूजा व आरती, श्री नवचंडीयाग व हवन, सायंकाळी 7 वाजता कुमारिका पूजन व धुपारती, रात्री 8 वाजता दांडिया नृत्य होईल. 1 ऑक्टोबर रोजी पूजा व आरती, सायंकाळी 6 वाजता कुंकूमार्जन व धुपारती, रात्री 8 वाजता दांडिया नृत्य होईल.

2 ऑक्टोबर रोजी पूजा व आरती, सायंकाळी 6 वाजता दीपोत्सव व धुपारती, रात्री 8 वाजता दांडिया नृत्य होईल. 3 ऑक्टोबर रोजी पूजा व आरती, दुपारी 3 वाजता देवीची उत्तरपूजा झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजता सवाद्य विसर्जन मिरवणूक निघेल. या उत्सवात भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शहरप्रमुख कुंदन सातपुते यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.