For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एक अनोखी विवाहपत्रिका

06:45 AM Aug 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
एक अनोखी विवाहपत्रिका
Advertisement

भारतातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत यांच्या विवाहाने गेला जवळपास एक महिना गाजवला आहे. या विवाहाची पत्रिकाच इतकी महाग होती की अशा एका पत्रिकेच्या खर्चात सर्वसामान्यांच्या घरातील एक विवाह झाला असता. त्या विवाहाप्रमाणेच ती पत्रिकाही गाजली होती. आता आणखी एक विवाह पत्रिका सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

Advertisement

एका विवाहेच्छू जोडप्याने आपल्या विवाहाची विचित्रच पत्रिका काढलेली आहे. सर्वसाधारणपणे पत्रिकेत ‘सहकुटुंब सहपरिवार यावे’ असे आमंत्रण असते. पण या विवाह पत्रिकेत आपण कल्पनाही करु शकणार नाही, असा संदेश आहे. ‘आमचा विवाह अत्यंत कमी खर्चात करण्याची आमची योजना आहे. कारण आम्ही त्यासाठी अधिक पैसा खर्च करण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे आपण विवाहाला नाही आलात तरी चालेल. केवळ आमचा विवाह होत आहे हे आपल्याला समजावे म्हणून ही पत्रिका पाठवत आहे. यातूनही जे आप्तस्वकीय विवाहाला येणारच आहेत त्यांना आमच्या विवाहात काम करावे लागेल. स्वयंसेवकगिरी करावी लागेल आणि सर्व कामे कंत्राटी पद्धतीने करुन घेण्याइतके पैसे आमच्याकडे नाहीत.’ अशी पत्रिका मिळाल्यानंतर या विवाहाला जाण्याचा उत्साह कोण दाखविणार ?

Advertisement
Advertisement
Tags :

.