मित्राला अनोखी श्रद्धांजली
अस्थींनी निर्माण केले सुंदर चित्र
मैत्री अन् कलेचा संगम ब्रिटनच्या कॉर्नवालमध्ये पहायला मिळाला आहे. 35 वर्षीय कलाकार मौली ह्यूजेसने स्वत:चा मित्र विल चारमॅनच्या आठवणी जपण्यासाठी वापरलेली पद्धत अनोखी आहे. प्रोफेशनल आर्टिस्ट असलेल्या मौलीने विलच्या स्मृतिप्रित्यर्थ त्याच्या अस्थींच्या राखेचा वापर करत एक अद्भूत चित्र तयार केले आहे. तिने अस्थींच्या राखेला चित्राच्या रंगांसोबत मिसळले आणि एक सीस्केप (समुद्राचे दृश्य) तयार केले. विलला सूर्यास्त अत्यंत पसंत होता, त्यावरच प्रेरित हे चित्र आहे.
28 एप्रिल 2023 रोजी वयाच्या केवळ 22 व्या वर्षी विलचा एका दुचाकी अपघातात मृत्यू झाला होता. विल स्वत:च्या कामावरून घरी परतत असताना दुर्घटना घडली होती. विलच्या अस्थींच्या राखेतून निर्माण होणाऱ्या चित्रासाठी मौलने विलचा भाऊ माइकसोबत मिळून काम केले. माइकने आईवडिलांना न सांगात विलच्या राखेतील काही हिस्सा मौलीला दिला. ही राख सांभाळणे माझ्यासाठी अत्यंत भावुक क्षण होता. जेव्हा माझ्याकडे ती राख होती, तेव्हा मला छोटासा ब्रेक घ्यावा लागला, कारण तो अत्यंत अजब क्षण होता. मला प्रारंभी दु:खाची जाणीव झाली. परंतु त्याच्या परिवाराला आराम देणारे काही निर्माण करणार असल्याने समाधानही वाटत होते असे मौली सांगते.
विलने समुद्रकिनारी रिकॉर्ड केलेल्या सूर्यास्तालाच मौलीने स्वत:च्या चित्रात रेखाटले आहे. विलची आई निकी चारमॅनने ही कलाकृती पाहिल्यावर ती दंगच राहिली. विल घरी येण्यापूर्वी त्या सुंदर दृश्याचा व्हिडिओ तयार करत होता. तो घराच्या जवळ पोहोचला होता, परंतु तो कधीच आमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही. हे चित्र म्हणजे प्रेम व्यक्त करण्याची सर्वात प्रेमळ पद्धत आहे. आता हे चित्र घरात लावण्यात आले आहे. या चित्राकडे पाहिल्यावर विल वास्तवात दुसऱ्या जगात स्वत:चे सर्वश्रेष्ठ जीवन जगतोय, असे वाटू लागते असे निकी चारमॅन यांनी म्हटले आहे.