चीनमध्ये कर्मचाऱ्यांदरम्यान अनोखा ट्रेंड
बॉसवरील संताप व्यक्त करण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धत
ऑफिसमध्ये बॉसचे नाव ऐकताच अनेक कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढते. चीनमध्ये काही कर्मचाऱ्यांनी ऑफिसच्या या समस्येला हाताळण्यासाठी एक अनोखी पद्धत शोधली आहे. येथे लोक स्वत:च्या बॉसच्या छायाचित्राचा वापर करत त्यांना व्हर्च्युअल पेट म्हणजेच डिजिटल पाळीवचे रुप देत आहेत. हा नवा ट्रेंड चीनमध्ये सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. खास बाब म्हणजेच यात कर्मचारी स्वत:चा बॉस किंवा एखाद्या अशा व्यक्तीच्या फोटोचा वापर करतात, ज्याला ते पसंत करत नाहीत. यानंर एआयच्या मदतीने त्या छायाचित्राला एका अशा डिजिटल पात्रात बदलतात, जे कॉम्प्युटर स्क्रीनवर फिरत राहते आणि वेगवेगळ्या हालचाली करताना दिसून येते.
व्हर्च्युअल पेट
व्हर्च्युअल पेटचा प्रकार नवा नाही. सुमारे दोन दशकांपूर्वी कॉम्प्युटर आणि मेसेज पाठविणाऱ्या प्लॅटफॉर्मवर अशाप्रकारचे डिजिटल पेट दिसून यायचे. हे स्क्रीनवर फिरत रहायचे आणि काही निर्धारित हालचाली करायचे. परंतु आता या एआयने या डिजिटल पेटला पूर्वीपेक्षा अधिक मजेशीर अन् पर्सनल केले आहे. आता युजर स्वत:च्या पसंतीनुसार त्याचा चेहरा, रुप अन् वर्तन बदलू शकतात. म्हणजेच स्क्रीनवर दिसणारा डिजिटल पात्र पूर्वीपासून निश्चित कृत्य करत नाही,तर त्याला वेगवेगळ्या प्रकारे तयार केले जाऊ शकते.
बॉसच्या फोटोचा वापर
एका इंटरनेट युजरने प्रसिद्ध उद्योजक एलन मस्क यांच्या रुपावर आधारित डिजिटल पेट तयार करून दाखविल्यावर चीनमध्ये यावरून सर्वाधिक चर्चा सुरू झाली. कुठल्याही व्यक्तीच्या छायाचित्राला कुठल्याही प्रकारच्या डिजिटल पेटमध्ये बदलता येऊ शकते हे या युजरने दाखवून दिले होते. हे पात्र डोकं झुकविणे, स्वत:ला थप्पड मारून घेणे आणि चहा सर्व्ह करण्यासारखी कृत्यं करून दाखवत होते. याला माऊसने ओढवल्यावर तो स्क्रीननच्या काठावर चढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दाखविले जात होते. म्हणजेच ज्या बॉसला पाहून कर्मचारी तणावात येतो, तोच बॉस आता त्याच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर एका छोट्याशा डिजिटल पात्राच्या रुपात फिरताना दिसून येऊ शकतो.
नापसंत व्यक्तीला करू शकता पेट
एका अन्य इंटरनेट युजरने अशी पद्धत शेअर केली, ज्यात नापसंत असलेल्या व्यक्तीला डिजिटल पेटमध्ये बदलण्याची पद्धत सांगण्यात आली आहे. या डिजिटल पात्राला स्क्रीनवर सरपटताना, गुडघे टेकताना आणि माफी मागताना दाखविले जाऊ शकते. याचमुळे हा ट्रेंड केवळ मनोरंजन म्हणून पाहिला जात असून काही युवा कर्मचारी याला कामाच्या तणावापासून काहीसा दिलासा मिळविण्याची मजेशीर पद्धत मानत आहेत.
लोकांना पसंत पडतोय ट्रेंड
ऑफिसमध्ये सातत्याने कामाचा दबाव आणि मानसिक थकवा कर्मचाऱ्यांसाठी मोठी समस्या ठरू शकते. अशास्थितीत काही लोक छोट्या छोट्या मजेशीर पद्धतींनी स्वत:चा तणाव कमी करण्याचा प्रयत्न करतात. व्हर्च्युअल पेल देखील अशाच प्रकारची एक डिजिटल पद्धत ठरून समोर आली आहे. कर्मचारी स्वत:च्याक् कॉम्प्युटर स्क्रीनवर एक असे पात्र पाहू शकता, ज्याला पाहुन तुमच्या चेहऱ्यावर हास्य उमटेल आणि कामादरम्यान त्यांचे लक्ष काही क्षणांसाठी तणावापासून हटेल
एआयमुळे याला स्वत:च्या पसंतीनुसार तयार करणेही सोपे झाले आहे. युजर कुठल्याही व्यक्तीचे छायाचित्र आणि काही निर्देश देत डिजिटल पेट तयार करवू शकतो. काही लोक याला स्वत: तयार करतात, तर तंत्रज्ञानाची अधिक माहिती नसलेले लोक याकरता पैसे देऊन अशी सेवा मिळवत आहेत. अशाप्रकारच्या सेवांसाठी शेकडो युआन खर्च करावे लागू शकतो. कुठल्याही व्यक्तीचे छायाचित्र प्राप्त करत त्याला एआयने बदलणे कायदेशीर समस्या निर्माण करू शकते असा इशारा तज्ञांनी दिला आहे. परंतु सध्या चीनमध्ये एआयने निर्मित डिजिटल पेट वेगाने लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.