For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीमंतांच्या मुलांचा अनोखा समर कॅम्प

07:00 AM Aug 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
श्रीमंतांच्या मुलांचा अनोखा समर कॅम्प
Advertisement

चीनमध्ये सध्या मुलांसाठी चालणाऱ्या एका खास प्रकारच्या समर कॅम्पची चर्चा होत आहे. सर्वसाधारणपणे समर कॅम्पचे नाव ऐकताच मुलांचे खेळ, मस्ती, हिंडणे-फिरणे आणि नव्या गोष्टी शिकण्याचे चित्र समोर येते. परंतु चीनमध्ये काही श्रीमंत परिवार स्वत:च्या मुलांना अशा कॅम्पमध्ये पाठवत आहेत, जेथे त्यांना शेतांमध्ये काम करण्यापासून झाडाची साल उतरविणे आणि दैनंदिन काम करण्यापर्यंतचे प्रशिक्षण दिले जाते. या कॅम्पमध्ये मुलांना पाठविण्यासाठी पालक लाखो रुपये खर्च करत आहेत. अशाप्रकारच्या हार्डशिप समर कॅम्पचा उद्देश मुलांना आरामदायी जीवनातून बाहेर काढत मेहनत आणि अवघड स्थितीचा अनुभव करविणे आहे. येथे मुलांना शेतांमध्ये काम करणे, पिकाशी निगडित काम शिकणे, सामग्री सांभाळणे आणि शहरात स्वत:च्या घरांमध्ये न केली जाणारी कामे करावी लागतात. अनेक मुलांना दिवसभर शारीरिक मेहनत करावी लागते, जेणेकरून त्यांना पैसे कमाविणे आणि जीवन चालविणे किती अवघड असू शकते, हे समजू शकेल.

Advertisement

कॅम्पचे शुल्क

या 10 दिवसांच्या कॅम्पचे शुल्क सुमारे 4 हजार युआन म्हणजेच जवळपास 48 हजार रुपये असल्याचे सांगण्यात येते. तर एक महिन्याच्या कॅम्पचे शुल्क 1.2 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. म्हणजेच ज्या मुलांचे आईवडिल स्वत:च्या मुलांना येथे पाठवतात, ते त्यांना मेहनतीचे महत्त्व समजाविण्यासाठी भरपूर पैसे खर्च करत आहेत. येथे मुलांचे मोबाइल फोन जमा करविले जातात, त्यानंतर त्यांना कॅम्पमध्ये निश्चित कार्ये आणि कामांमध्ये भाग घ्यावा लागतो. जी मुले मेहनत करत नाहीत, त्यांना खाण्यात मिळणाऱ्या बटाट्याचे प्रमाण कमी केले जाते. अशाप्रकारे मुलांना काम आणि मेहनतीच्या हिशेबानुसार गोष्टी मिळण्याचा अनुभव करविला जातो.

Advertisement

इतके काम का?

कॅम्प आयोजकांनुसार याचा उद्देश पैसे सहजपणे मिळत नाहीत, हे मुलांवर बिंबविणे आहे. शहरांमध्ये राहणारी अनेक मुले बालपणापासून अशा सुविधांदरम्यान मोठी होतात, जेथे त्यांना भोजन, वास्तव्य आणि इतर गरजांसाठी अधिक मेहनत करावी लागत नाही. आईवडिल त्यांच्या अनेक गरजा त्वरित पूर्ण करतात. अशास्थितीत मुलांना मेहनत आणि पैशांचे खरे मूल्य समजणे अवघड असू शकते. याचमुळे मुलांना काही काळासाठी आरामदायी जीवनापासून दूर ठेवणे आवश्यक असल्याचे काही आईडिलांचे मानणे आहे.

कॅम्पवरून उपस्थित होणारे प्रश्न

अशाप्रकारच्या कॅम्पवरून प्रश्नही उपस्थित होत आहेत. मुलांकडून इतकी मेहनत करविणे आणि त्यांना अवघड परिस्थितींमध्ये ठेवणे योग्य पद्धत आहे का यावर वेगवेगळी मते समोर येत आहेत. मुलांना मेहनतीचे महत्त्व अवश्य समजवावे, परंतु याकरता त्यांचे वय, सुरक्षा आणि शारीरिक क्षमतेचा विचारही केला जावा असे काही लोकांचे मानणे आहे. तर आजच्या काळात मुलांना सर्व सुविधा उपलब्ध करविण्यात आल्याने ते छोट्या छोट्या समस्यांमध्येही लवकर घाबरून जातात. अशास्थिती काही काळासाठी त्यांना वास्तविक जीवनाच्या आव्हानांची ओळख करून देणे त्यांच्या व्यक्तिमत्त्व अन् मनस्थिती विकासात मदत करू शकते असे काही आईवडिलांचे सांगणे आहे.

चीनचा हा हार्डशिप समर कॅम्प यामुळे चर्चेत आहे, कारण येथे श्रीमंत परिवारांच्या मुलांना पैसे आणि सुविधांच्या जगतातून बाहेर काढत मेहनतीच्या जीवनाचा अनुभव करविला जात आहे. कॅम्पचे मोठे शुल्क आणि मुलांकडून करविण्यात येणाऱ्या कामाने मुलांना मेहनत शिकविण्याची योग्य पद्धत कोणती असा प्रश्न उपस्थित केला आहे. शेतांमध्ये काम करविणे आवश्यक आहे का, मग दैनंदिन आयुष्याच्या छोट्या छोट्या जबाबदाऱ्या देत त्यांना आत्मनिर्भर केले जाऊ शकते का, हा सवाल आता चर्चेचा विषय ठरला आहे.

Advertisement
Tags :

.