कपड्यांचे ‘अनोखे दुकान’
उधारीवर कपडे न्या, पार्टीत घालून जा, परत करा
विवाह-पार्ट्यांमध्ये सर्वाधिक खर्च कपड्यांवर होत असतो. परंतु सर्वात अवघड बाब म्हणजे हे कपडे सांभाळणे असते. डिझाइनर कपड्यांना तुम्ही वारंवार परिधान करू शकत नाही. अशा लोकांसाठी ‘अनोखे दुकान’ खुले झाले असून जेथून कपडे उधार घेता येतात. हे कपडे परिधान करत पार्टीत जाता येते आणि परत करता येतात. याकरता नाममात्र शुल्क या दुकानाकडून आकारले जात आहे.
नेदरलँडची राजधानी अॅमस्टरडॅममध्ये ही अनोखी पॅशन लायब्रेरी सुरू झाली आहे. येथे तुम्ही कुठल्याही कपड्यांच्या बदल्यात अन्य कुठलेही कपडे नेऊ शकतात. म्हणजे तुम्हवाला निळ्या किंवा पांढऱ्या रंगाचा शर्ट हवा असल्यास त्या बदल्यात दुसरा शर्ट देऊन स्वत:ची गरज भागवू शकता. येथे जुने किंवा नवे कपडे भाडेतत्वावर घेता येतात. या लायब्रेरीला ‘बिग शेयर्ड वॉर्डरोब’ म्हटले जात आहे. याचा उद्देश कपड्यांची नासाडी रोखणे आहे. एलिसा जेन्सनने स्वत:च्या बहिणींसोबत मिळून 2014 मध्ये हे दुकान सुरू केले होते.
प्रसिद्ध ब्रँडचे कपडे उपलब्ध
लायब्रेरीत अनेक प्रसिद्ध ब्रँड आणि स्टाइलचे कपडे उपलब्ध आहेत. डिझाइनर सूट तसेच चमकणारे ओव्हरकोट आणि पँट्स देखील आहेत. सामान्य कपड्यांचे भाडे 40 ऊपयांपर्यंत आहे, प्रत्येक कपड्यावर प्रतिदिन भाड्याचा टॅग असतो, जेणेकरून तुम्हाला त्याचा दर समजावा. ग्राहकांवरही किंमत निर्धारित होते, म्हणजेच जर तुम्ही नेहमी कपडे घेऊन जात असाल तर कमी भाडे द्यावे लागते. या सुविधेमुळे लोक अत्यंत खुश आहेत, त्यांना त्यांच्या मनपसंतीचे कपडे मिळत आहेत असे उद्गार एनजीओच्या पॅम्पेन मॅनेजर इकराम शाकिर यांनी काढले आहेत.
60 टक्के अधिक खरेदी
संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालानुसार वर्तमान काळात सामान्य व्यक्ती 15 वर्षांपूर्वीच्या तुलनेत 60 टक्के अधिक कपडे खरेदी करत आहे. याचमुळे पूर्वीच्या तुलनेत कपड्यांचा वापर अत्यंत कमी होत आहे. याचमुळे अधिक कपड्यांची निर्मिती होत कार्बन उत्सर्जनही वाढत आहे. लोकांचा पैसाही अधिक प्रमाणात खर्च होतोय. समुद्रात सोडण्यात येणारे एक तृतीयांश मायक्रोप्लास्टिक कपड्यांच्या कारखान्यांमधूनच पोहोचत आहे. हे मायक्रोप्लास्टिक मासे आणि माणसांसाठी विषारी असतात.