चीनमधील अनोखे जेल
गुन्हेगार नव्हे तर स्थुल व्यक्तींना डांबले जातेय
सोशल मीडियावर सध्या चीनच्या ‘फॅट प्रिजन’ची चर्चा होत आहे. हे अनोखे जेल केवळ स्थुल लोकांसाठी आहेत, जेथे वजन कमी करण्याची आवश्यकता असलेल्या लोकांसाठी हा जेल आहे. या जेलमध्ये येत लोक स्वत:ची नोंदणी करवून घेत आहेत.
या जेलमध्ये स्थुल लोकांना बंद केले जाते, त्यांचा बाहेरील जगासोबतचा संपर्क तोडला जातो. याचबरोबर तीनवेळा संतुलित आहार पुरविला जातो आणि दिवसात 4 तास किंवा अधिक वेळ एक्सरसाइज करविला जातो. म्हणजेच या जेलमधून बाहेर पडेपर्यंत व्यक्तीच्या शरीराचा आकारच बदललेला असतो.
अत्यंत प्रसिद्ध जेल
चीनचा हा जेल काही सरकारकडून निर्मित नसून हा प्रायव्हेट वेट लॉस बूट कॅम्प्स किंवा स्लिमिंग सेंटर आहे. येथे ओव्हरवेट किंवा ओबिस लोक स्वत: पैसे भरून प्रवेश घेतात. सोशल मीडियावर याला ‘चायनीज पॅट प्रिजन’ नाव मिळाले आहे. याचे कारण येथील कठोर दिनक्रम आहे. एकदा तुरुंगात गेल्यावर तेथून बाहेर पडता येत नाही. फोनचा वापर मर्यादित आहे. तसेच नो स्नॅकिंग आणि केवळ रिगरस एक्सरसाइडज. लोक येथे रॅपिड वेट लॉससाठी येतात आणि स्वत:ची ट्रान्सफॉर्मेशन जर्नी शेअर करतात.
चीनमध्ये वाढली समस्या
चीनमध्ये स्थुलत्व मोठी समस्या ठरली आहे. तेथील 50 टक्क्यांपेक्षा अधिक प्रौढ ओव्हरवेट किंवा ओबिस आहेत. यामुळे मुलेही प्रभावित होत आहेत. अनेक कॅम्प्स खासकरून मुलांसाठी आहेत, जेथे मिलिट्री स्टाइल प्रशिक्षण दिले जाते. सरकारने देखील तीन वर्षांचे ओबेसिटी कमी करण्यासाठी अभियान हाती घेतले आहे. अशा स्थितीत वेट लॉस पॅम्प्स पूर्ण देशात सुरू झाले आहेत. चेंगदू, बीजिंग इत्यादी शहरांमध्ये अनेक कॅम्प सुरू होत आहेत. पॅम्पमध्ये दिवसाची सुरुवात एक्सरसाइजने होते, मग लो कॅलरीयुक्त आहार, वेट चेक आणि मग प्रशिक्षण दिले जाते. अनेक पॅम्प्समध्ये 4-8 तासांचा एक्सरसाइडज, डेली वेटिंग, स्नॅकिंवर सर्व्हिलान्स देखील केले जाते. यादरम्यान बाहेर संपर्क कमी ठेवला जातो, कारण लोक घरात डायट नियंत्रित करु शकत नाही.