फ्रान्समधील अनोखे संग्रहालय
महिन्यातील एक दिवस अनोखे प्रदर्शन
जगात एकाहून एक विचित्र गोटी असून त्या पाहण्यासाठी किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी हिंमत असावी लागते. गुहेत जाणे, ट्रेकिंग किंवा पॅराग्लायडिंग करणे साहसी असते. परंतु फ्रान्समध्ये एक खास संग्रहालय असून तेथे दर महिन्यातील एक दिवस अनोखी प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. परंतु अजब बाब म्हणजे हे संग्रहालय प्रवेशासाठी लोकांना नग्न होण्याची अनुमती देते. पण लाकडी आच्छादनावर चालणे आणि अस्वच्छतेपासून वाचण्यासाठी बूट परिधान केले जाऊ शकतात. हे संग्रहालय फ्रान्सच्या मार्सिले शहरात आहे. याला मार्सिले म्युझियम या नावाने ओळखले जाते. हे संग्रहालय युरोपच्या निसर्गवादाचा इतिहास दर्शविणाऱ्या चित्रांना प्रदर्शित करत आहे, याचमुळे लोकांनी कपड्यांशिवाय येथे येत चित्रांशी जोडून घ्यावे अशी यामागे इच्छा आहे.
या प्रदर्शनात कलेचे अनेक नमुने असून यात छायाचित्रे, चित्रपट, नियतकालिक, मूर्ती आणि अनेक प्रकार सामील आहेत. हे फ्रान्स आणि स्वीत्झर्लंडमध्ये निसर्गवादी समुदाय आणि सार्वजनिक आणि खासगी संग्रहातून जमविलेले आहे. यात पॅरिसमध्ये सेंटर पोम्पीडौ, लौवर आणि बर्नची स्वीस नॅशनल लायब्ररी सामील आहे. संग्रहालयाची न्यूड व्हिजिटर्सची घोषणा लोकांसाठी सांस्कृतिक झटकाच होता. फ्रान्समध्ये नग्नतेबद्दल किती मुक्त भूमिका आहे पाहून इंग्लंडचे लोक चकितच झाले आहे. हे संग्रहालय फ्रान्सच्या अशा लोकांसाठी आघाडीचे पर्यटनस्थळ आहे, जे बाहेर न्यूड राहणे पसंत करतात. स्वीत्झर्लंड आणि जर्मनीत नॅचरिस्ट आंदोलन 19 व्या शतकात सुरू झाले होते. तर फ्रान्समध्ये पहिले नेचरिस्ट ग्रूप 1930 मध्ये उदयास आला होता. मार्सिले आंशिक स्वपरात स्वत:च्या माइल्ड क्लायमेटमुळे फ्रान्समध्ये नेचरिस्टांचे मुख्य केंद्र मानले जाते.