For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News | पाचवड गावात वडिलांवरील प्रेमाचा अनोखा आविष्कार; पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

02:04 PM Jun 04, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   पाचवड  गावात वडिलांवरील प्रेमाचा अनोखा आविष्कार  पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
Advertisement

                                वडिलांप्रती कृतज्ञतेचा अनोखा सन्मान; पाचवडमध्ये पुतळ्याचे अनावरण

Advertisement

सातारा - "आई-वडील... हे केवळ नाते नसते, तर ते आपल्या आयुष्याचा पाया असतात. त्यांच्या कष्टांनी, त्यागाने आणि संस्कारांनी घडलेले जीवन त्यांच्याशिवाय कधीच पूर्ण होत नाही. काळाच्या पडद्याआड गेल्यानंतरही त्यांच्या आठवणी मात्र प्रत्येक क्षणी आपल्या सोबत असतात.

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पाचवड येथे आज अशाच एका भावनिक क्षणाचा साक्षीदार संपूर्ण परिसर ठरला. समाजसेवक, ज्येष्ठ नागरिक आणि अनेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे स्वर्गीय माधव दादा भिसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे भव्य अनावरण करण्यात आले. वडिलांचे कार्य, त्यांचे विचार आणि त्यांनी दिलेले संस्कार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावेत, यासाठी मुलगा आणि सुनेने हा आगळावेगळा उपक्रम राबवला. आणि त्याच क्षणी आकाशातून हेलिकॉप्टरमधून झालेली पुष्पवृष्टी... उपस्थितांच्या डोळ्यांत नकळत अश्रू आणणारी ठरली.

Advertisement

फुलांच्या वर्षावात न्हाऊन निघालेला माधव दादा भिसे यांचा पुतळा, टाळ्यांचा कडकडाट आणि भावनांनी भरलेले वातावरण... जणू संपूर्ण पाचवड गाव आपल्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाला कृतज्ञतेची मानवंदना देत होते.
यावेळी सातारा जिल्ह्याचे भाजप खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, सुनील काटकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी स्वर्गीय माधव दादा भिसे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.

वडील हे घराचे छप्पर असतात... ते दिसत नसले तरी त्यांची सावली कायम आपल्या सोबत असते. आणि म्हणूनच पाचवडमध्ये पार पडलेला हा सोहळा केवळ पुतळ्याचे अनावरण नव्हता, तर एका मुलाने आपल्या वडिलांप्रती व्यक्त केलेल्या प्रेमाचा, आदराचा आणि कृतज्ञतेचा जिवंत उत्सव होता.

Advertisement
Tags :

.