हेलिकॉप्टरच्या आत अनोखे हॉटेल
किचन-बाथरुमसोबत दोन-दोन बेडरुम
जेव्हा तुम्ही कुठे फिरायला जाता, तेव्हा अशा हॉटेलमध्ये राहण्याची संधी मिळावी ज्याचा लुक आणि आसपासचे वातावरण आल्हाददायक असावे अशी इच्छा असते. परंतु प्रत्येकवेळी हे शक्य नसते. जर तुम्हाला चांगल्या हॉटेलचा आनंद घ्यायचा असेल किंवा केवळ पाहूनच आनंदी व्हायचे असेल तर एक व्हायरल व्हिडिओ अवश्य पहा. यात अमेरिकेतील एक अनोखे हॉटेल दाखविण्यात आले आहे. हे हॉटेल एका हेलिकॉप्टरच्या आत निर्माण करण्यात आले आहे. याचा आतील लुक मन जिंकणारा आहे.
हे हॉटेल मोटो रँच एट क्रूमचा हिस्सा आहे. जे अमेरिकेच्या ब्रुक्सविला, फ्लोरिडामध्ये हे ठिकाण एका अॅडव्हेंचर पार्कसारखे आहे. तेथे लोक मोटरसायकलिंग करतात, हे ठिकाण 26 एकरमध्ये फैलावलेले आहे. अलिकडेच या हेलिकॉप्टर हॉटेलचा व्हिडिओ एका इसमाने शेअर केला आहे.
हे हॉटेल अमेरिकन चिनूक हेलिकॉप्टरमध्ये निर्माण करण्यात आले आहे. या हॉटेलमध्ये दोन बेडरुम्स, किचन, बाथरुम, खाण्यापिण्याच्या वस्तू आणि कॉकपिट दिसून येते. आत एसी, फ्रिज यासारख्या गरजेच्या अनेक गोष्टी देखील आहेत. हे हॉटेल एअर बीएनबीवर नोंदणीकृत असून याचे बुकिंग करण्यासाठी किमान 2 रात्रींसाठी वास्तव्य करावे लागते. एक रुम जर 2 रात्रीसाठी दोन जणांनी बुक केली तर त्याचा एकूण खर्च 46,300 रुपये इतका येतो.
व्हिडिओ होतोय व्हायरल
या व्हिडिओला आतापर्यंत 7 लाखाहून अधिक ह्यूज मिळाल्या आहेत. तर अनेक लोकांनी कॉमेंट करत प्रतिसाद दिला आहे. हे हॉटेल तर अत्यंत मोठे वाटत असल्याचे प्रतिक्रिया दिली आहे. तर या ठिकाणी राहण्याची इच्छा असल्याचे अन्य युजरने नमूद केले आहे. मी कधीच हेलिकॉप्टरमध्ये गेलो नाही, यामुळे तेथे नक्कीच वास्तव्य करू इच्छितो असे अन्य एका इसमाने म्हटले आहे.