महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जहाजाच्या आकारातील अनोखा किल्ला

06:42 AM Jul 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अनेक चित्रपटांमधून झळकलेले ठिकाण

Advertisement

सेगोवियाचा अल्काजर स्पेनमधील ऐतिहासिक शहर सेगोवियामधील एका शानदार महाल आहे. स्वत:ची आकर्षक वास्तुकला आणि इतिहासामुळे हा महाल दरवर्षी हजारो पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. स्वत:च्या मनमोहक सौंदर्यासाब्sात सेगोवियाचा अल्काजर अनेक असाधारण गोष्टी सामावून आहे. डिस्नेच्या सिंड्रेला कॅसलसाठी प्रेरणेच्या स्वरुपात काम करणाऱ्या या प्रतिष्ठित किल्ल्याची एक रंजक कहाणी आहे.

Advertisement

अल्काजरच्या सर्वात आकर्षक पैलूंमध्ये याचा जहाजासारखा आकारही सामील आहे. स्वत:चे धनुष्य आणि बुलवार्कसोबत हा मध्ययुगीन महाल शहराच्या सागरी पार्श्वभूमीचे प्रतीक आहे. एका रणतीकि पर्वताच्या शिखरावर असलेल्या अल्काजार आसपासच्या भागाचे आकर्षक दृश्य सादर करतो. एका पर्वतावर असल्याने हे अत्यंत सुंदर आणि अत्यंत सुरक्षित ठिकाण आहे.

अल्काजरच्या आकर्षक उपस्थितीने अनेक डिस्ने महालांच्या डिझाइनला प्रेरित केले आहे. यात सर्वात उल्लेखनीय डिस्नेलँडचे प्रसिद्ध स्लीपिंग ब्यूटी कॅसल आहे, याची परीकथा सारखी वास्तुकला आणि आश्चर्यजनक टॉवर्सनी लाखो लोकांच्या कल्पनेला वाव दिला आहे. हे डिस्नेचा क्लासिक चित्रपट ‘सिंड्रेला’मध्ये दाखविण्यात आलेल्या जादुई महालासाठी प्रेरणा राहिले आहे. हा महाल अनेक चित्रपट आणि सीरिजमध्ये दिसून आला आहे.

पूर्ण इतिहासात सेगोवियाचा अल्काजर अनेक राजांसाठी एक शाही महाल म्हणून कार्यरत राहिला आहे.  कॅस्टिलेच्या इसाबेल आणि फिलिप द्वितीय समवेत अनेक स्पॅनिश राजा आणि राण्यांचा काळ या महालाने अनुभवला आहे. याचबरोबर हा अनेक प्रकारच्या स्थापत्यशैलींना प्रदर्शित करतो. रोमन शैलीच्या पायापासून गॉथिक तत्व आणि पुनर्जागर परिवर्धनापर्यंत अल्काजर स्थापत्य शैलींसाठी अनोखे उदाहरण ठरला आहे.

अल्काजरमध्ये कलेचा विशाल संग्रह दिसून येतो. यात जटिल टेपेस्ट्री आणि सुंदर चित्रेही पहायला मिळतात. याचबरोबर या महालात मध्ययुगाच्या काळातील शस्त्रास्त्रांचा एक मोठा साठा देखील आहे. हा अनोखा किल्ला अनेकदा आग आणि नवया निर्मितीपासून वाचला आहे. अनेक प्रकारच्या आव्हानांनंतरही याचे ऐतिहासिक महत्त्व आणि भव्यता कायम आहे. याला युनेस्कोने जागतिक वारसास्थळ घोषित केले आहे. अल्काजर आश्चर्यकारक उद्यानांनी वेढलेला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article