For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेझॉनच्या जंगलात मिळाला अनोखा मासा

06:22 AM Jan 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
अमेझॉनच्या जंगलात मिळाला अनोखा मासा
Advertisement

शरीरावर दिसतोय रहस्यमय अवयव

Advertisement

अमेझॉनच्या घनदाट आणि रहस्यमय वर्षावनांमध्ये दडलेली रहस्यं जगाला चकित करत असतात. अलिकडेच अमेझॉनच्या वर्षावनांमध्ये वैज्ञानिकांनी एक असा मासा शोधला आहे, ज्याच्या शरीराच्या रचनेने जीवशास्त्राच्या जुन्या दाव्यांना पूर्णपणे आव्हान दिले आहे. दक्षिण कोलंबियाच्या सॅन राफेलनजीक एक ब्लॅकवॉटर प्रवाहात मिळालेला हा मासा आकारात एक इंचापेक्षाही कमी आहे. परंतु तयाच्या शरीरावर असलेला एका विशेष अवयव याला जगातील अन्य सर्व जीवांपेक्षा अत्यंत वेगळा आणि अनोखा ठरवितो. हा मासा आकारात अत्यंत सुक्षम आहे, परंतु याच्या शारीरिक संरचनेने विकासवादाच्या जुन्या सिद्धांताला हादरविले आहे. जीव जसजसे आकारात छोटे होत जातात, कालौघात त्यांची शारीरिक जटिलता कमी होऊ लागते असे सर्वसाधारणपणे मानले जाते.

दीर्घकालीन धारणा ठरली चुकीची

Advertisement

लघुकरणाच्या प्रक्रियेत जीव स्वत:च्या जटिल अवयवांना गमावतात असे जीवशास्त्रज्ञ मानायचे, परंतु या माशाने ही धारणा चुकीची ठरविली आहे. या माशांच्या पेल्विक फिन्सदरम्यान त्वचेचा एक पातळ, डिस्क सारखा फ्लॅप आढळला आहे. ही कर्टेनसारखी आकृती त्याच्या शरीराच्या खालील हिस्स्यात असून जी आजवर कुठल्याही माशाच्या प्रजातीत पाहिली गेली नाही असे फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ साओ कार्लोसच्या संशोधकांनी सांगितेल आहे.

अवयवाचे नेमके काम काय?

अखेर या अवयवाचे काम काय आहे असा प्रश्न आता वैज्ञानिकांना पडला आहे. हे प्रजननादरम्यान परस्पर संवादाचे एक माध्यम असू शकते असे काही तज्ञांचे मानणे आहे. तर हा अवयव माशाला नदीच्या तळाशी पोहताना स्थिरता प्रदान करणारा एक स्टेबलायजर असू शकतो असा इतरांचा अनुमान आहे. या शोधादरम्यान एकत्रित करण्यात आलेली माहिती आणि जुन्या नमुन्यांच्या विश्लेषणातून या प्रजाती दक्षिण कोलंबियाच्या विशिष्ट क्षेत्रांमध्येच आढळून येत असल्याचे कळते.

प्रियोचॅरेक्स प्रजाती

संशोधकांनी अलिकडेच त्यांचे विश्लेषण केले आणि संग्रहात पूर्वीपासून उपलब्ध नमुन्यांची तपासणी केली, यामुळे या क्षेत्रात दोन नव्या प्रियोचॅरेक्स प्रजातींच्या अस्तित्वाचा शोध लागला. ब्राझीलच्या संरक्षित क्षेत्रांनजीक या प्रजाती मिळणे हे जैवविविधता समजून घेणे आणि माशांच्या संरक्षणासाठी हे क्षेत्र किती महत्त्वपूर्ण आहे हे दर्शविते. प्रियोचॅरेक्स सारखी प्रजाती पृथ्वीवर अद्याप अशी अनेक रहस्यं आहेत, ज्यांचा शोध लागायचा आहे याची आठवण करून देते. क्षेत्रीय संशोधन आणि संरक्षणाचे प्रयत्न किती आवश्यक आहेत ही बाब देखील हा शोध अधोरेखित करतो. अमेझॉनच्या या ब्लॅकवॉटर प्रवाहांची पर्यावरणीय व्यवस्था अत्यंत नाजुक असते. येथे पाण्याची आम्लता आणि रंग विशिष्ट असतो, जो या सुक्ष्मजीवांना बहरण्यासाठी एक विशेष वातावरण प्रदान करतो. जर या क्षेत्रांच्या पर्यावरणीय संतुलनात किंचितही बदल घडला तर या दुर्लभ प्रजाती विलुप्त होऊ शकतात.

विस्तृत अध्ययनाची गरज

या माशांचे वास्तविक वर्तन समजून घेण्यासाठी आम्हाला पुन्हा त्याच दुर्गम क्षेत्रात जावे लागेल आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासात त्यांचे बारकाईने निरीक्षण करावे लागणार आहे. हा शोध केवळ विज्ञानासाठी एक मोठी कामगिरी नसून हे वर्षावनांच्या संरक्षणाच्या जागतिक आवश्यकतेलाही मजबुतीने व्यक्त करतो. जर या क्षेत्रांना सुरक्षित ठेवले गेले नाही तर आम्ही अशा अनेक अदभूत प्रजातींना जाणून घेण्यापूर्वीच गमावून बसू असे उद्गार वैज्ञानिकांनी काढले आहेत. सध्या हा मासा स्वत:च्या शारीरिक रचनेद्वारे पूर्ण जगातील जीवशास्त्रज्ञांना कोड्यात टाकणारा ठरला आहे. भविष्यातील अध्ययनच आता निसर्गाने या चिमुकल्या जीवाला इतका जटिल अवयव कोणत्या उद्देशाने प्रदान करणार हे स्पष्ट होणार आहे.

Advertisement
Tags :

.