For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जुन्या जीवाश्मात अनोखी गोष्ट

07:00 AM Aug 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
जुन्या जीवाश्मात अनोखी गोष्ट
Advertisement

वैज्ञानिकांच्या खुलाशामुळे जग अवाक्

Advertisement

वैज्ञानिकांच्या एका शोधाने पूर्ण जगाला चकित केले आहे. प्राचीन काळात मधमाशा प्राण्यांच्या हाडांच्या आत पोळं निर्माण करत होत्या, असा खुलासा एका संशोधनात झाला आहे. रॉयल सोसायटी ओपन सायन्स नियतकालिकात हा शोध प्रकाशित झाला आहे. संशोधकांनी कॅरेबियन बेट हिस्पानियोला (हैती आणि डॉमिनिकन प्रजासत्ताक)च्या एका चुनादगडाच्या गुहेतून एक जीवाश्म शोधला होता, जो 20 हजार वर्षे जुना होता. वैज्ञानिकांना या जीवाश्माच्या जबड्याच्या हाडांच्या आत मधमाशांच्या पोळ्याचे पुरावे मिळाले आहेत. या जबड्यांच्या खालच्या दातांच्या खड्ड्यांमध्ये मधमाशांच्या पोळ्याच्या स्पष्ट खुणा मिळाल्या आहेत.

जीवाश्मांची तपासणी करण्यात आली असता जबड्याच्या दातांखाली असामान्य, गुळगुळीत अन् पात्रासारखा पृष्ठभाग दिसून आला. हा सामान्य मातीचा जमाव नव्हता, तर एकाकी (सोलिटरी) मधमाशांकडून तयार करण्यात आलेले पोळं होतं, असे आढळून आले. या संशोधनानुसार मधमाशांनी गुहेच्या मुलायम आणि चिकट मातीत सापडलेल्या जीवाश्माच्या जबड्यांमध्ये शिरून तेथेच स्वत:चा तळ ठोकला होता. या गुहेत दीर्घकाळापर्यंत घुबडांचा अधिवास राहिला असावा. घुबट स्वत:च्या शिकारीला पूर्णपणे गिळल्यावर पचन न होणाऱ्या अवशेषांना पेलेट्सच्या रुपात बाहेर काढतात. शतकांपर्यंत हे पेलेट्स जमा होत गेले आणि जमिनीवर जीवाश्म तयार होण्याची प्रक्रिया झाली. यामुळे 50 हून अधिक प्रजातींच्या प्राण्यांची हाडं सुरक्षित राहिली. तेथे मधमाशांचा जीवाश्म मिळालेला नाही. परंतु विशिष्ट संरचनेच्या आधारावर वैज्ञानिकांनी त्यांना नव्या प्रकारच्या ट्रेस फॉसिल च्या रुपात वर्गीकृत केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.