For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनोखा कॅफे, दर 15 मिनिटांनी पडतो पाऊस

06:24 AM May 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
अनोखा कॅफे  दर 15 मिनिटांनी पडतो पाऊस
Advertisement

ग्राहकांना बाळगावा लागतो रेनकोट

Advertisement

सध्या कॅफेची संकल्पना केवळ मोठ्या नव्हे तर छोट्या शहरांमध्येही वाढत चालली आहे. याचमुळे लोक वेगवेगळ्या थीमचे कॅफे सादर करत आहेत, ज्यात ग्राहकांची गर्दी असते.  काही ठिकाणी जंगलाची थीम असलेला कॅफे दिसून येईल. तर काही ठिकाणी अॅक्वेरियमची थीम असलेला कॅफे पाहता येतो. परंतु दक्षिण कोरियातील एक कॅफे इतरांपेक्षा अत्यंत वेगळा आहे. या कॅफेचे वैशिष्ट्या म्हणजे येथे दर 15 मिनिटांनी पाऊस पडतो. यामुळे ग्राहकांना रेनकोट, छत्री आणि रबर बूट्ससोबत बसावे लागते.

जर तुम्हाला रेनी डेच्या वातावरणात कॉफीचा आस्वाद घ्यायचा असेल तर सोल येथील एक कॅफे तुमच्यासाठी उत्कृष्ट ठिकाण आहे. या कॅफेचे नाव रेन रिपोर्ट कॅफे असून तेथे दर 15 मिनिटांनी पाऊस पडतो. ग्राहकांना छत्री, रेनकोट आणि रबर बूट्स दिले जातात. हा कॅफे सोलच्या इटेवॉन येथे असून तो काळ्या रंगात असून चहुबाजूला बांबूची लागवड करण्यात आली आहे. यामुळे गर्दीयुक्त शहरात हे अत्यंत वेगळे वाटते.

Advertisement

कॅफेत मोठ्या खिडक्या असून त्यातून एका अंगणाकडे पाहता येते. तेथेच पाऊस पडतो, दर 15 मिनिटांनी हा पाऊस होतो. बाहेर कुठलेही हवामान असले तरीही कॅफेत जोरदार पाऊस पडतो. यामुळे लोकांना आल्हाददायक वाटते. ग्राहकाला यात भिजायचे असल्यास तो अंगणात जात याचा आनंद घेऊ शकतो.

सोशल मीडियावर लोकप्रिय

कॅफे स्वत:कडून मोफत प्लास्टिक छत्री, रेनकोट आणि रबर बूट्स देतो, ज्यामुळे लोक या पावसाचा आनंद घेऊ शकतात. हा कॅफे 2024 मध्ये सुरू झाला होता आणि तेव्हापासून इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसर्सदरम्यान अत्यंत लोकप्रिय आहे. हे अनेकदा तेथे फोटो आणि व्हिडिओजसाठी येत असतात.

Advertisement
Tags :

.