अनोखे परंतु सुंदर बेट
अत्यंत अद्भूत आहे येथील क्रेटर सरोवरं
पोर्तुगालच्या अजोरेसमध्ये अनोखे बेट असून याला आइसलँड ऑफ साओ मिगुएल या नावाने ओळखले जाते. हे एक ज्वालामुखीय बेट असून ते तीन सक्रीय ज्वालामुखींमुळे निर्माण झाले आहे. येथे आढळून येणारी ‘क्रेटर सरोवरं’ आणि लैगून अत्यंत अद्भूत आहेत. तसेच या बेटावर अद्भूत नैसर्गिक सौंदर्य पहायला मिळते. याचमुळे याला पृथ्वीवरील सर्वात सुंदर बेटांपैकी एक मानले जाते. आता याच बेटाचा एक मनस्पर्शी व्हिडिओ व्हायरल होत आहे.
साओ मिगुएल एक ज्वालामुखीय बेट असून यात क्रेटर सरोवरे आणि हिरवाईने युक्त मैदाने आहेत. तसेच येथे लैगून आणि गोड पाण्याची सरोवरं देखील आहेत. साओ मिगुएल बेटावर अनेक क्रेटर सरोवरं आणि लैगून आहेत. लागोआ डो फोगो असेच एक क्रेटर सरोवर असून ते बेटाच्या मध्यस्थानी अगुआ डे पाउ मैसिफ स्ट्रैटोवालकानो येथे आहे. तर बेटावर असलेल्या अन्य दोन क्रेटर सरोवरांची नावं सँटियागो आणि कांगरो अशी आहेत.
सँटियागो सरोवर सेटे सिडॅड्स ज्वालामुखीवर 364 मीटरच्या उंचीवर स्थित असून त्याचे पृष्ठभागीय क्षेत्रफळ 0.25 चौरस किलोमीटर इतके आहे. तर कमाल खोली 33 मीटर इतकी आहे. साओ मिगुएलच्या दक्षिण किनाऱ्यावर विला फ्रँका डो कॅम्पोचे आयलेट असून ते एक छोटे बेट आहे. हे बेट पोहण्यासाठी लोकप्रिय ठिकाण मानले जाते.