Kolhapur News | एका दुचाकीला धडक बसली अन् पुढच्याच सेकंदाला 'तो' विचित्र युटर्न; कोल्हापुरातील नामवंत बेकरीत नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात विचित्र अपघात
कोल्हापूर -हॉटेलजवळ शहरातील गोकुळ असलेल्या दत्त गुरु बेकरी या दुकानात दुपारच्या सुमारास अचानक चार चाकी घुसल्याने दुकानातील दोन व्यक्ती जखमी झाल्या. तर चारचाकीच्या वाहनचालकाने ब्रेकऐवजी चुकून एक्सिलेटर दाबल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या धडकेत दुकानाचेही नुकसान झाले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल होऊ शकला नाही. घटनेनंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अपघातामुळे काही काळ बाहतूक कोंडीही निर्माण झाली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघाताबाबत अधिक तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्यामाहितीनुसार, मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास कोल्हापुरातील स्टेशन रोडवर विचित्र अपघात झाला. शाहूपुरी घोरपडे गल्लीतून आलेली कार एका दुचाकीला धडकली. त्यामुळे भेदरलेल्या चालकानं स्टेअरिंग फिरवलं आणि गाडीने पूर्ण युटर्न घेतला. पुढे ही गाडी स्टेशन रोडवरील दत्तगुरू बेकरीत घुसली. या अपघातात बेकरी चालक टेंबुळकर दाम्पत्य जखमी झाले.
दरम्यान दुचाकीला कार धडकल्याने दुचाकीस्वार लटपटला. आपल्याकडून अपघात झाला, या भीतीच्या भावनेतून कार चालकानं गाडीचं स्टेअरिंग अचानक वळवलं आणि या कारनं स्टेशन रोडवर चक्क युटर्न घेतला. दरम्यान चालकाचं नियंत्रण सुटल्यानं, ही कार थेट स्टेशन रोडवरील दत्तगुरू बेकरीत घुसली. आंबा भडंग विकणाऱ्या या बेकरीतील विश्वनाथ टेंबुळकर आणि साक्षी टेंबुळकर हे दाम्पत्य जखमी झालं. या अपघातात बेकरीचं मोठं नुकसान झालं. अपघातानंतर प्रचंड वर्दळ असलेल्या स्टेशन रोडवरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली. शाहूपुरी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी कार चालकाला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेलं. दरम्यान, नुकसान भरपाई देण्याच्या अटीवर हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समजते.