कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

धर्मस्थळमधील ‘त्या’ प्रकरणाला ट्विस्ट

06:24 AM Aug 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आरोपी चिन्नय्याने मानवी कवट्या धर्मस्थळामध्ये आणण्यापूर्वी नेले होते दिल्लीला 

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

धर्मस्थळमधील कथित शेकडो मृतदेह दफन प्रकरणासंबंधी तक्रार केलेला आरोपी आणि त्याच्या साथीदारांकडून एका मागून एक रहस्य उघडकीस येत आहे. प्रमुख आरोपी चिन्नय्या याने रचलेला कट दिल्लीत शिजल्याचे उघडकीस आले आहे. शनिवारी चिन्नय्याला एसआयटीने अटक करून दहा दिवसांसाठी आपल्या ताब्यात घेतले होते. त्याची सखोल चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी उजेडात आल्या आहेत. चिन्नय्याने आणलेल्या मानवी कवट्या धर्मस्थळमध्ये आणण्यापूर्वी ते दिल्लीला नेले होते, असे समजते.

या कटातील टोळीने चिन्नय्याला मानवी कवटीसह दिल्लीला घेऊन जात तेथील प्रमुख लोकांना भेटून त्यांना कवटी दाखविण्यात आली आहे. त्याठिकाणी कवटीसह या प्रकरणाची संपूर्ण कहाणी सांगण्यात आले होते. या प्रकरणात मोठा व्यवहाराचा कट शिजविला जात होता, असे चिन्नय्याने चौकशीदरम्यान गुप्त माहिती उघड केली आहे.

कवटी सादर करून साक्षीदार संरक्षण कायद्याअंतर्गत न्यायालयाकडून सुरक्षा मिळवली होती. अशाप्रकारे, एसआयटी चिन्नय्याचे म्हणणे ऐकत होती. त्यानुसार, चिन्नय्यांनी दाखवलेल्या 17 ठिकाणी ख•s खोदल्यानंतर एसआयटी अधिकाऱ्यांनी त्यांना मूळ कवटीबद्दल विचारपूस केली. या काळात त्याने प्रत्येक ठिकाणाचे नाव सांगितले होते. प्रथम बोलियार त्यानंतर कल्लेरी आणि दुसऱ्या ठिकाणाचे नाव सांगितले होते. कवटीतील माती धर्मस्थळाच्या वातावरणाची नव्हती, असे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीनेदेखील पुष्टी केली होती. हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी एसआयटीने चिन्नय्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने कवटी दुसऱ्या ठिकाणाहून आणल्याचे सांगितले.

टोळीकडून घेतले दोन लाख रुपये

धर्मस्थळात शेकडो मृतदेह दफन केल्याच्या प्रकरणात एसआयटीच्या ताब्यात असलेला चिन्नय्या प्रारंभी सदर टोळीकडून 2 लाख ऊपये घेऊन नाटक केल्याची बाब उघडकीस आली आहे. डिसेंबर 2023 मध्ये सदर टोळीने चिन्नय्याशी संपर्क साधून मृतदेह पुरल्याची कबुली देण्याबाबत कट शिजविल्याचे उघडकीस आले आहे. चौकशीदरम्यान चिन्नय्याने अपप्रचार करणाऱ्या टोळीत कोण होते हे उघड केले आहे. यावेळी त्याने महेश शेट्टी तिमरोडी आणि गिरीश मट्टन्नवर यांची नावे सांगितली. 19 तास चाललेल्या चौकशीत आरोपी चिन्नयाने काही स्फोटक गोष्टी उघड केल्या आहे. एसआयटी अधिकाऱ्यांना या संपूर्ण प्रकरणातील सूत्रधारांच्या भूमिकेची माहिती दिल्याचेही सूत्रांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर एसआयटीने चिन्नय्या यांची सखोल चौकशी करत अधिक माहिती गोळा करण्यात व्यस्त आहे.

या प्रकरणामागील व्यक्ती लवकरच उघडकीस : गृहमंत्री

या प्रकरणामागील व्यक्ती लवकरच उघडकीस येईल, असा विश्वास गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी व्यक्त केला आहे. रविवारी बेंगळुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, धर्मस्थळ आणि धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे यांच्याबद्दल अनेक वर्षांपासून अनेक चर्चा होत होत्या. युट्यूबर्स देखील याबद्दल बोलत होते.  प्रत्येकजण धर्माचा अविभाज्य घटक आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

युट्यूबर समीर चौकशीसाठी हजर

युट्यूबर समीर रविवारी मंगळूर जिल्ह्याच्या बेळतंगडी पोलीस स्थानकात चौकशीसाठी हजर झाला. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओ बनवून धर्मस्थळाविरुद्ध चुकीची माहिती पसरवण्यासह भडकावल्याबद्दल समीरविरुद्ध धर्मस्थळ पोलीस स्थानकासह विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. धर्मस्थळ प्रकरणात न्यायालयाने समीरला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.  तथापि, त्याला चौकशीसाठी हजर राहण्याचा इशारा दिला होता. पोलिसांच्या नोटीसनंतर समीर त्याच्या वकिलांसह अनेक कागदपत्रे आणि लॅपटॉपसह बेळतंगडी सर्कल इन्स्पेक्टरच्या कार्यालयात हजर झाला.

सुजाता भटची घरातूनच होणार एसआयटी चौकशी

अनन्या भट बेपत्ताबाबत दररोज गोंधळात टाकणारी विधाने करून जनतेची दिशाभूल करणाऱ्या सुजाता भटची लवकरच तिच्या घरी चौकशी करण्याचा निर्णय एसआयटीच्या विशेष पथकाने घेतला आहे. सुजाता भट राहत असलेल्या बनशंकरी येथील तिच्या निवासस्थानी पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एक-दोन दिवसांत तिची चौकशी होण्याची शक्मयता आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article