For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

योग्य सल्ला देतो तोच खरा ज्योतिषी ज्योतिष मित्रमंडळाची बैठक

07:25 AM Jul 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
योग्य सल्ला देतो तोच खरा ज्योतिषी ज्योतिष मित्रमंडळाची बैठक
Advertisement

► त. भा. प्रतिनिधी

Advertisement

बेळगाव

जो ज्योतिषी गणितात पारंगत आहे व ज्याच्याजवळ चिंतन, मनन व आध्यात्मिक साधनेची जोड आहे, असा ज्योतिषी गाढ अभ्यासाद्वारे मानवी जीवनात येणाऱ्या संधींचा कसा उपयोग करावा हे सांगून शक्यतो कोणावर पश्चातापाची वेळ येऊ नये यासाठी योग्य सल्ला देतो, असे उषा सुभेदार यांनी सांगितले.

Advertisement

ज्योतिष मित्रमंडळाच्या बैठकीत राशीस्वामींची वैशिष्ट्यो या विषयावर त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, अभ्यासासाठी धैर्य, अर्थ, काम, मोक्ष व पृथ्वी, अग्नि, वायू व जल तत्वांच्या तीन तीन राशींनी बारा राशींचे चक्र तयार होते. यापैकी मंगळ गुरुकडे अग्नि व जलतत्व देण्यात आले असून बुध, शुक्र, शनीकडे वायू तत्व देण्यात आले आहे. कुंडलीमधील बारा स्थानांचा विचार करून मानवी जीवनातील प्रत्येक बाबींचा सखोल विचार करता येतो. या चर्चेत दुर्गाप्रसाद नाईक, शिवाजी शहापूर, अशोक देशपांडे यांनी भाग घेतला. निशांत मोदगेकर यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :

.