For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पळसंब - बुधवळे रस्त्यावर चिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी

01:27 PM Sep 12, 2024 IST | अनुजा कुडतरकर
पळसंब   बुधवळे रस्त्यावर चिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी
Advertisement

अपघातात शेताचे मोठे नुकसान ; नुकसानभरपाईशिवाय ट्रक काढू देणार नसल्याची ग्रामस्थांची भूमिका

Advertisement

आचरा |  प्रतिनिधी

मालवण तालुक्यातील पळसंब येथे बुधवळे पळसंब रस्त्यावर चिरे वाहतूक करणारा सोळा चाकी ट्रक रस्त्याकडील शेतात पलटी झाला. ओव्हरलोड असणारा ट्रक (KA 33 B 5841) रस्त्याच्या कडेला घातल्याने रस्त्यालगतच्या कडेचा पूर्ण भाग कोसळून ट्रक समारे 6 फूट खोल लागतच्या शेतात कोसळला सुदैवाने कोणतीही जीवितहानी हानी झाली नाही. मात्र , शेतकरी दीपक आपकर यांच्या शेताचे मोठया प्रमाणत नुकसान झाले आहे. जोपर्यंत शेतकरी दीपक आपकर यांच्या शेताची नुकसान भरपाई आणि धोकादायक बनलेल्या रस्त्याची संरक्षकभिंत ट्रकमालक बांधून देण्याची हमी देत नाही तोपर्यंत सदर ट्रक काढू देणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

Advertisement

बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास बुधवळे येथील चिरेखाणी वरून सोळाचाकी ट्रक आचरा कणकवली रस्त्याचे दिशेने येत होता. ओव्हरलोड असणारा ट्रक रस्त्याच्या कडेला घेतल्याने रस्त्याच्या कडेचा भाग पुर्ण कोसळून ट्रक लागतच्या शेतात कोसळला. या अपघातात ट्रकचालक व क्लीनर दोघेही सुदैवाने बचावले. अपघाताची घटना कळताच माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर, सरपंच महेश वरक, उपसरपंच अविराज परब, सुहास सावंत, राजू चव्हाण , पपू सावंत यांनी धाव घेतली. अपघातानंतर चालकाने पळ काढला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गणेश चतुर्थीला आवजड वाहतूक बंद असतानाही वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने चालू होती असा यावेळी ग्रामस्थांनी सवाल करत जोपर्यंत रस्त्याला संरक्षकभिंत आणि शेतकऱ्याचे झालेले नुकसान भरून दिले जात नाही. तोपर्यंत अपघाग्रस्त ट्रक काढू दिला जाणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

Advertisement
Tags :

.