सापापेक्षा अधिक विषारी वृक्ष
खाली उभे राहिल्यास जाऊ शकतो जीव
आमची पृथ्वी अनेक प्रकारचय आश्चर्यांनी व्यापलेली आहे. यातील काही माणूस, तर काही जीव अन् रोपं देखील आश्चर्यकारक असतात. एक असाच वृक्ष सध्या चर्चेत आला आहे. या वृक्षाचे विषय हे कुठल्याही सापाइतकेच तीव्र असते. अनेकदा तर काही साप देखील या वृक्षाच्या तावडीत सापडून स्वत:चा जीव गमावत असतात. विषारी प्राण्यांचा उल्लेख आल्यास सर्वप्रथम सापाचे नाव समोर येते. सर्पदंशामुळे अनेक लोकांचा मृत्यू होत असतो. फारच कमी प्राणी हे सापांना घाबरत नसतात. कॅरेबियनमध्ये अनेक मॅनचिनिल वृक्षांवर खबरदारीचे फलक दिसून येतात. पावसादरम्यान या वृक्षाखाली उभे राहण्यास मनाई केली जाते, कारण यामुळे संबंधिताचा जीव धोक्यात येऊ शकतो. या वृक्षाच्या खाली राहिल्यास याचे विष शरीरात भिनून माणसाची प्रकृती अस्वस्थ होऊ शकते. या वृक्षाचे विष अत्यंत घातक मानले जाते. याचमुळे या वृक्षांच्या सान्निध्यात न जाण्याची सूचना कॅरेबियनमध्ये केली जाते. स्थानिक लोक या वृक्षांपासून दूर राहणेच पसंत करतात.