काँग्रेस रोडवर वृक्ष कोसळला
11:35 AM Oct 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : परतीच्या जोरदार पावसाने झाडांची पडझड होऊ लागली आहे. गुरुवारी परतीच्या वादळी पावसाने काँग्रेस रोडवरील सेकंड गेटजवळ झाड कोसळले. त्यामुळे काहीकाळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी दाखल होऊन झाड हटवून मार्ग मोकळा केला. मागील काही दिवसांपासून परतीचा जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे झाडांची आणि घरांची पुन्हा पडझड होऊ लागली आहे. जोरदार पावसाने मुख्य काँग्रेस रोडवरच झाड कोसळल्याने वाहतुकीला अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने दाखल होऊन झाडाचा अडथळा दूर केला.
Advertisement
Advertisement