महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पावसामुळे बिजगर्णी रस्त्यावर झाड कोसळले

06:06 AM Jun 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही : वारंवार कोसळणाऱ्या झाडांमुळे वाहनधारकात भीती

Advertisement

वार्ताहर / किणये

Advertisement

तालुक्याच्या पश्चिम भागात गुऊवारी झालेल्या पावसामुळे रात्री बिजगर्णी रस्त्यावर झाड कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बिजगर्णी-बेळगुंदी रस्त्यावर वारंवार कोसळणाऱ्या झाडांमुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दि.9 रोजी दुचाकीवरून जात असताना बेळगुंदी स्मशानभूमीजवळ दुचाकीवर झाड कोसळून कर्ले गावातील दोन तऊण ठार झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुऊवारी रात्री बिजगर्णी इंदिरानगर जवळ रस्त्यावर पुन्हा झाड कोसळल्याने प्रवाशांच्या भीतीत भर पडली आहे.

वाहनधारकांमधून नाराजी

शुक्रवारी सकाळी रस्त्यावरून वाहतूक करताना वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला. शुक्रवारी दुपारपर्यंत तरी या झाडाची उचल करण्यात आली नव्हती. त्यामुळे वाहनधारकांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली.

 किमान फांद्या तरी तोडा

बिजगर्णी-बेळवटी रस्त्यावर तसेच बेळगुंदी-राकसकोप रस्त्यावर अजूनही बरीच झाडे कोसळण्याच्या मार्गावर आहेत. या झाडांच्या किमान फांद्या तरी तोडाव्यात अशी मागणी वाहनधारकांमधून व स्थानिक नागरिकांतून होत आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article