मध्यप्रदेशात गुना येथे ट्रेनर विमान कोसळले
कॅप्टनसह पायलट जखमी
वृत्तसंस्था/ गुना
मध्यप्रदेशातील गुना हवाईपट्टीवर रविवारी दोनआसनी ट्रेनर (प्रशिक्षण) विमान कोसळले. रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास प्रशिक्षण सुरू असताना सुमारे 40 मिनिटे उ•ाण केल्यानंतर विमान कॉम्प्लेक्समध्येच ही दुर्घटना घडली. अपघातग्रस्त विमान बेंगळूर येथे मुख्यालय असलेल्या ‘बेळगाव एव्हिएशन’चे आहे. ते शा-शिब अकादमीमध्ये चाचणी आणि देखभालीसाठी आणले होते. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या अपघातात पॅप्टन व्ही. सी. ठाकूर आणि पायलट नागेश कुमार जखमी झाले आहेत. पॅन्ट पोलिसांसह अकादमीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत अधिक तपास सुरू केला आहे.
मध्यप्रदेशातील गुना येथे शा-शिब एव्हिएशन अॅपॅडमीचे दोन आसनी विमान 152 व्रॅश झाल्याची माहिती देण्यात आली. या छोट्या विमानातून दोन वैमानिकांनी विमानाच्या चाचणी उ•ाणासाठी झेप घेतली होती. त्यानंतर सुमारे 40 मिनिटे उ•ाण केल्यानंतर विमान हवाईपट्टी परिसरातच कोसळले. विमान सरावासाठी दोन्ही पायलटही बेळगाव एव्हिएशनमधून आले होते. दुर्घटनेत जखमी झालेल्या दोन्ही पायलटना ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती धोक्मयाबाहेर असल्याचे कँट पोलीस स्थानकाचे अधिकारी दिलीप राजौरिया यांनी सांगितले.
बेळगाव एव्हिएशन टेनिंग इन्स्टिट्यूटचे एअरक्राफ्ट 152 गुना येथील शा-शिब अकादमीमध्ये चाचणी आणि देखभालीसाठी आणण्यात आले होते. त्याच्या चाचणीसाठी वैमानिक व्ही चंद्र ठाकूर आणि नागेश कुमार यांना हैदराबादहून बोलावण्यात आले होते. हे दोघेही शनिवार, 10 ऑगस्ट रोजी गुना येथे पोहोचले होते. त्यानंतर रविवारी विमानाने चाचणीसाठी उ•ाण केल्यानंतर 40 मिनिटांनी ते कोसळले. अपघाताची माहिती मिळताच कँट पोलीस ठाण्याचे प्रभारी दिलीप राजौरिया घटनास्थळी पोहोचले. दोन्ही जखमी वैमानिकांना उपचारासाठी संजीवनी ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात कसा घडला याचा तपास शा-शिब अकादमी करत आहे, असे राजौरिया यांनी सांगितले.