For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माजगाव सरपंच पदासाठी दुरंगी लढत निश्चित

06:11 PM Apr 17, 2026 IST | अनुजा कुडतरकर
माजगाव सरपंच पदासाठी दुरंगी लढत निश्चित
Advertisement

भाजपा पुरस्कृत विरुद्ध अपक्ष अशी थेट लढत

Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी

माजगाव ग्रामपंचायतच्या थेट सरपंच पदासाठी दुरंगी निवडणूक होणार असल्याचे शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी स्पष्ट झाले. सरपंच पदासाठी रंजना रवींद्र कानसे, जयश्री दिनेश सावंत, श्रद्धा मुकुंद सावंत, सपना सतीश गावडे असे चार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी श्रद्धा मुकुंद सावंत आणि सपना सतीश गावडे या दोघींनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता सरपंच पदासाठी रंजना रवींद्र कानसे, जयश्री दिनेश सावंत यांच्यात ही थेट निवडणूक होणार आहे. त्यामुळे माजगाव सारख्या महत्त्वाच्या ग्रामपंचायत सरपंच पदाची ही निवडणूक भाजपा पुरस्कृत विरुद्ध अपक्ष अशी रंगणार आहे.माजगाव ग्रामपंचायत सदस्यासाठीच्या पोटनिवडणुकीत वार्ड क्रमांक ४ मधून राजीवी रुपेश पेडणेकर यांचा एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती. तर वार्ड क्रमांक २ मधून शुक्रवारी शिल्पा शशिकांत साळगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे अनघा प्रदीप धुरी यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून कृषी अधिकारी यशवंत परब काम पाहत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.