महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बीड, परभणी घटनेची सखोल चौकशी

06:26 AM Dec 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती : दोन्ही घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत

Advertisement

नागपूर :  प्रतिनिधी

Advertisement

राज्यातील बीड आणि परभणी जिल्ह्यामधील घटना दुर्दैवी आहेत. या दोन्ही घटनांची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. बीड जिह्यातील सरपंच हत्येच्या प्रकरणाची न्यायालयीन आणि एसआयटी अशी दुहेरी चौकशी केली जाणार आहेश. तर परभणीमधील संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी केली जाणार असल्याची  माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. बीड, परभणी घटनांमधील दोन्ही मफतांच्या कुटुंबियांना दहा लाख ऊपयांची आर्थिक मदत तर शांतता प्रस्थापित करणारे मफत विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत देण्यात येणार, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

बीडमधील प्रकरणाची न्यायालयीन व एसआयटी मार्फत चौकशी करण्याबरोबर जिल्हा पोलीस अधिक्षकांची बदली करण्यात येईल. या प्रकरणातील दोषींवर मोक्का अंतर्गत कारवाई करून बीड जिह्यातील भूमाफिया, वाळूमाफियांसह इतर प्रकारच्या गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढू, अशी स्पष्ट भूमिकाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत मांडली. परभणीत पोलीस अधिकारी अशोक घोरबांड यांना निलंबित करून त्यांनी वाजवीपेक्षा अधिक पोलीस बळाचा  वापर केला आहे काय, याची चौकशी केली जाणार असल्याचे नमूद केले आहे.

दोन्ही घटनेतील अल्पकालीन चर्चेला उत्तर

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, परभणी जिह्यातील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. भारताच्या संविधानाचा अपमान हा सर्व भारतीयांचा अपमान आहे. त्यामुळे हा अपमान सहन केला जाणार नाही. परभणी येथील कृत्य एका मनोरूग्णाने केले आहे. तो मनोऊग्ण असल्याचा स्पष्ट वैद्यकीय अहवालही उपलब्ध आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. या प्रकरणात कोंबिंग ऑपरेशन झाले नाही. परभणीत सकल हिंदू समाजाचा मोर्चा हा सर्वपक्षीय होता. या मोर्चात बांग्लादेशमधील हिंदूंसंदर्भात मागणी करण्यात आली होती. त्यामुळे ही हिंदू विरूद्ध दलित अशी दंगल नाही. परभणीत झालेल्या तोडफोडीत दुकाने, वाहने, सरकारी कार्यालयांचे नुकसान झाले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

 सोमनाथ सूर्यवंशी यांचा रिपोर्टमध्ये मल्टिपल इन्जुरीचा उल्लेख : जितेंद्र आव्हाडांचा आरोप

परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा रिपोर्टमध्ये मल्टिपल इन्जुरीचा उल्लेख असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागफहात चुकीची माहिती दिली असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, सोमनाथ सूर्यवंशी यांनी स्वत:ला माऊण घेतले की काय?. जिवंत पणी मेले म्हणूनच मल्टिपल इन्जुरीचा उल्लेख करण्यात आला. जुन्या जखमा असत्या तर तसा उल्लेख त्यामध्ये करण्यात आला असता. माझ्याकडे रिपोर्ट आहे तुम्हाला पाठवतो. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड यांच्यावर कोणते गुन्हे दाखल करण्यात येणार असा सवालही आव्हाड यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणी व बीड प्रकरणावर गोलमाल उत्तर दिले आहे. त्यांच्या उत्तराने आमचे समाधान झालेले नसून या प्रकरणी रस्त्यावरची लढाई लढावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी शपचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी  प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिला.

 मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही : मुख्यमंत्र्यांची ग्वाही

कल्याण येथील सोसायटीमध्ये मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कार्यवाही सुरू आहे. मुंबई ही मराठी माणसांची अस्मिता आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केले. कल्याणमधील मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी विधानपरीषदेत आमदार अॅड. अनिल परब यांनी मांडलेल्या विधानपरिषद नियम 289 अन्वये चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले.

प्रत्येक मराठी माणसाचा योग्य मान-सन्मान ठेवणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

कल्याणमध्ये मराठी माणसाला झालेली मारहाण आणि अन्यायाच्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले. महाराष्ट्र हा ‘शिव-शाहू-फुले आंबेडकरां’चा आहे. इथे कुणी मराठी माणसावर अन्याय करत असेल तर ते चालणार नाही, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागफहात सांगितले.

मराठी माणसाचा कोणालाही अपमान करता येणार नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याणमध्ये गुरुवारी एका मराठी कुटुंबाला दोन परप्रांतीय कुटुंबाकडून मारहाण करण्यात आली, त्या घटनेबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांनी सभागफहात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई देखील केली आहे. मराठी माणसांची अस्मिता जपण्यासाठीच शिवसेनेची निर्मिती झाली आहे. महाराष्ट्रात मराठी माणसाचा कोणालाही अपमान करता येणार नाही, कोणाचाही मुलाहीजा ठेवला जाणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

 

Advertisement
Next Article