For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘ब्लॅक कॉफी’ पार्टीतील मृत्यूची सखोल चौकशी व्हावी

06:28 AM Apr 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘ब्लॅक कॉफी’ पार्टीतील मृत्यूची सखोल चौकशी व्हावी
Advertisement

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची मागणी

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ पणजी :

‘गुड फ्रायडे‘च्या पवित्र दिवशी हणजूण येथे आयोजित ‘ब्लॅक कॉफी‘ कार्यक्रमात 21 वर्षीय तऊणाचा झालेला मृत्यू हा आवश्यक परवानगींचा अभाव आणि पोलिसांच्या निष्काळजीपणाचा परिणाम आहे, असा आरोप काँग्रेस पक्षाने केला असून प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Advertisement

शनिवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शुक्रवारी हणजूण येथे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डीजे ‘ब्लॅक कॉफी’ यांचा ‘टेक्नो म्युझिक’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुळात ‘गुड फ्रायडे’ हा ख्रिस्ती समाजासाठी अत्यंत पवित्र व धार्मिक महत्त्व असलेला दिवस आहे. त्यामुळे तो गंभीर चिंतन, प्रार्थना आणि आत्मपरीक्षणाच्या भावनेने पाळला जातो. अशा पवित्र दिवशी डीजे सारख्या संगीत कार्यक्रमाला परवानगी देणे म्हणजे गोव्यातील जनतेच्या धार्मिक भावनांचा स्पष्ट आणि हेतुपुरस्सर केलेला अपमान आहे, असा आरोप करत सदर कार्यक्रम होऊच नये, अशी मागणी काँग्रेसने आधीच केली होती असे पाटकर यांनी सांगितले.

तरीही प्रशासनाने त्यांना मान्यता दिली व जी भीती काँग्रेसने व्यक्त केली होती ती सत्यात उतरली. या कार्यक्रमात एका 21 वर्षीय तऊणाला जीव गमवावा लागला, असे पाटकर यांनी सांगितले. या मृत्यूची आता सखोल चौकशी व्हावी व कॅथोलिक समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी सरकारने माफी मागावी, अशी मागणी पाटकर यांनी केली आहे. याप्रश्नी आम्ही तक्रार दाखल करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.HeÀesìes

Advertisement
Tags :

.