For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडीत दहावीतील विद्यार्थ्याची गळफासाने आत्महत्या

10:55 PM Jan 16, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडीत दहावीतील विद्यार्थ्याची गळफासाने आत्महत्या
Advertisement

सावंतवाडी: प्रतिनिधी
सावंतवाडी शहरातील जुनाबाजार_कामतनगर येथील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली.जतिन प्रशांत राऊळ (16) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेने सावंतवाडी शहरात खळबळ माजली आहे. पोलीस घटनास्थळी रवाना झाले असून अधिक तपास करीत आहेत. जतिन राऊळ हा उत्कृष्ट कबड्डीपटु होता. यंदा तो राज्यस्तरावर खेळला होता. त्याची राष्ट्रीय स्तरावर देखील निवड झाली होती. आज शाळेत इतिहासाचा पेपर होता. परंतु जतिन टेक्निकलचा विद्यार्थी असल्याने शाळेत गेला नव्हता. जतिनने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे समजू शकले नाही. दरम्यान या घटनेमुळे सावंतवाडी शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.