For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाडेकरु म्हणून राहिला अन् स्वत:वरच गोळी झाडून मालकाला अडकवलं...

06:07 PM May 17, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
भाडेकरु म्हणून राहिला अन् स्वत वरच गोळी झाडून मालकाला अडकवलं
Advertisement

नवी दिल्लीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  घर मालकाकडून पैसे उकळण्यासाठी आणि घर सोडून जाण्याचा तगादा थांबवण्यासाठी , स्वतःवर जीवघेणा करुन तो मालकाने केल्याचा बनाव रचणाऱ्या एका भाडेकरूला त्याच्या दोन साथीदारांसह उत्तर दिल्लीत अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार अविनाश कुमार नावाच्या आरोपीने त्याच्या साथीदारांसोबत मिळून त्याच्या मांडीत गोळी मारण्याचा आणि ही घटना अज्ञात हल्लेखोरांनी केलेला हल्ला असल्याचे भासवण्याचा कट रचला, असे त्यांनी सांगितले.

स्वत:वरच झाडली गोळी

Advertisement

हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार पोलिसांच्या माहितीनुसार, १० मे रोजी कुमारने पोलिसांना कळवले की, चांदनी चौकातील कुचा बुलाकी येथील त्याच्या भाड्याच्या घरात एक अज्ञात व्यक्ती घुसला आणि त्याने त्याच्यावर गोळीबार केला. पोलिसांनी सांगितले की, कुमारने दावा केला की दोन ते तीन गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यापैकी एक गोळी त्याच्या उजव्या मांडीला चाटून गेली.

रुग्णालयात दाखल

गोळीबारा्च्या घटनेनंतर त्यांच्या मुलाने उपचारासाठी लोक नायक जयप्रकाश रुग्णालयात नेले. गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून रक्ताचे डाग आणि दोन रिकामी काडतुसे जप्त केल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला," असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

या घटनेचा तपास करताना असे उघड झाले की, कुमार आणि त्याचे कुटुंब भाडेकरू म्हणून राहत होते आणि मालकाने जागा विकल्यानंतर त्यांना ती जागा सोडून जा असे सांगण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले.

तपासी अधिकाऱ्यांना असे आढळून आले की, कुमारने तीस हजारी न्यायालयात मालकांविरुद्ध दिवाणी दावा देखील दाखल केला होता आणि मालमत्ता खाली करण्याच्या बदल्यात आर्थिक तडजोडीसाठी त्यांच्यावर दबाव आणण्याचा कट रचला होता. "कुमारने, सहआरोपी दीपक कुमार आणि हरियाणातील सोनीपत येथील लोकेश दहिया यांच्यासोबत मिळून बनावट गोळीबाराचा कट रचला होता," असे पोलिसांनी सांगितले.

गुन्ह्यात वापरलेली एक कार दीपक कुमारकडून जप्त करण्यात आली. पोलिसांनी कुमारच्या सांगण्यावरून एक गावठी पिस्तूल, दोन मॅगझिन आणि १४ जिवंत काडतुसे, तसेच गुन्हा करताना आरोपीने वापरलेले पाच मोबाईल फोनही जप्त केले.

Advertisement
Tags :

.