चुंबकीय गुणधर्माने युक्त मंदिर
उत्तराखंडमधील कसार देवी मंदिर
उत्तराखंडच्या कुमायूं क्षेत्रातील अल्मोडा जिल्हय़ामधील कसार देवी मंदिर स्वतःच्या चुंबकीय गुणधर्मांमुळे भारतच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. हे मंदिर एक विशेष धार्मिक स्थळ आहे, याचबरोबर हे अद्वितीय चुंबकीय शक्तीचे केंद्र आहे. याच्या भूचुंबकीय प्रभावाला नासानेच मान्यता दिली आहे. पृथ्वीवर या विलक्षण चुंबकीय प्रभावाची केवळ तीन ठिकाणे असून कसार देवी मंदिर यातील एक आहे.
या मंदिराला स्वामी विवेकानंद, रविंद्रनाथ टागोर यांच्यासह तिबेटी बौद्धगुरु लामा अंगारिका गोविंदा, पाश्चिमात्य बौद्ध अभ्यासक रॉबर्ट थुरुमॅन यासारख्या प्रसिद्ध व्यक्तींनी भेट दिलेली आहे. हे मंदिर समुद्रसपाटीपासून 2,116 मीटर उंचीवर आहे. या गावातील एका गुहेत स्वामी विवेकानंद यांनी ध्यानधारणा केली होती.
या मंदिराचा वैज्ञानिक दृष्टीकोन अत्यंत रंजक असून त्याचा संबंध चुंबकीय मंडळ किंवा मॅग्नेटोस्फियरशी आहे. पृथ्वीच्या मॅग्नेटोस्फियरमुळे मोठय़ा संख्येत ऊर्जावान कण एक थर तयार करून असून त्याला वॅन एलन रेडिएशन बेल्ट म्हटले जाते. भूचुंबकीय क्षैत्र सौर वादळांना रोखत असतात.
नासाला पृथ्वीवर अशाप्रकारच्या आणखी दोन जागांचा शोध घेता आला आहे. पेरूमधील प्रसिद्ध माचू चपिच्चू आणि इंग्लंडमधील कास्टोनहेंज ही ती दोन ठिकाणे आहेत. या तिन्ही स्थानांवर भूचुंबकीय प्रभावामुळे माणसाच्या मनाला अत्यंत शांततेचा अनुभव प्राप्त होतो. येथे ध्यान करणे अत्यंत वेगळा अन् विशेष अनुभव आहे.