कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

न्हावेलीत गव्यांच्या उच्छादाने काजू कलमांची नासधूस

05:22 PM Jul 26, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

न्हावेली / वार्ताहर

Advertisement

न्हावेली गावात गव्या रेड्यांनी पुन्हा एकदा उच्छाद मांडला असून न्हावेली येथील बागायतदार शेतकरी श्री.शशिकांत रघुनाथ परब यांच्या बागेतील काजू कलमांचे नासधूस करुन मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.दरम्यान गव्या रेड्यांनी काजू कलमांचे नुकसान केल्याची बातमी कळताचं न्हावेली गावचे उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी वनविभागाशी संपर्क केला असता वनविभागाची टिम तात्काळ न्हावेली गावात दाखल होऊन नुकसानाची पाहणी केली. यावेळी वनपाल पृथ्वीराज प्रताप यांनी आपल्या टिमसह नुकसानग्रस्त शेतकरी श्री.परब यांच्याकडून माहीती घेत नुकसानभरपाई मिळवून देण्याची आश्वासन दिले. जंगली प्राणी मानवी वस्त्यांमध्ये शिरकाव करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे, तसेच यामुळे परीसरातील शेती, बागायतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. गव्या रेड्यांच्या वारंवार होणाऱ्या उपद्रवाला गावातील ग्रामस्थ ञस्त झाले असून जंगली प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानामुळे शेतकऱ्यांना मोठा ञास सहन करावा लागत आहे, यावर वनविभागाने लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी शेतकरी वर्गातून वारंवार केली जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update # nhaveli # marathi news
Next Article